पूज्य भन्ते यश थेरो यांच्या नियोजनात कठीण चिवरदान सोहळा

IMG-20251029-WA0027

बुलढाणा : बुध्द रश्मी महाविहाराचे संस्थापक श्रीलंकेचे पूज्य भंते यश थेरो यांच्या प्रमुख नियोजनात रविवार,6 ऑक्टोबर रोजी चिखली रोडवरील अराध्या लॉन येथे कठीण चिवरदान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी शेकडोंच्या संख्येने बुध्दधम्म उपासक, उपासिकांची उपस्थिती होती.
यावेळी पुज्य भंत्ते गुरू भन्तेजी यांच्या प्रेरणेतून पू.भंन्ते उदितज्ञान थेरो श्रीलंका, पू. भन्ते उपाली थेरो श्रीलंका, पू.भन्ते ज्ञानरक्षीत थेरो संभाजी नगर ,पूज्य भंन्ते विवेक थेरो श्रीलंका, पू.भंत्ते शांन्तीवित थेरो श्रीलंका, पू.धम्मसेन थेरो दिल्ली, पू.भंन्ते गुणानंद अभिभू नागपूर,पूज्य भंन्ते पूण्ण श्रीलंका, पू. भंन्ते लिपी शिवली थायलंड, पू.भंन्ते परमानन्द बोध्दगया तसेच प्रविज्जित सर्वश्री श्रामनेर गण शिरामनेर आनन्द उत्तर प्रदेश , सुभाहू, वंगीत,उत्तर, इंदसार,रेवत,विमल, धम्मधर नागपूर यांची उपस्थिती होती. यानिमित्त भिख्खू संघाच्यावतीने उपस्थित उपासक, उपासिकांना धम्म देसना देण्यात आली.
सोहळ्यास आमदार संजय गायकवाड यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी भंत्तेना चिवर दान करून वंदन केले. शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनीही सोहळयाला भेट देऊन पूज्य भन्तेंना वंदन केले. कठीण चिवरदान ॲड. दिनेश गवई व त्यांच्या सह धम्म चारिणी यांनी केले. यश सिध्दी सेवा सैनिक संघ यांनी मानवंदना दिली. इंजिनीयर निलेश इंगळे यांनी भिक्खु संघास भोजनदान दिले. धम्म यात्रा बुध्द रश्मी विहारापासून काढण्यात आली. या
शोभा यात्रेचे नियोजन माजी सभापती दिलीप जाधव , धम्मसेवक उदयोजक विजय वाकोडे, समाजभुषण भैयासाहेब पाटील, पत्रकार बाबासाहेब यांनी केले. या कठीण चिवरदान धम्म सोहळ्यात बंगलोर, उत्तर प्रदेश, नागपूर, मुंबई, आमरावती, वर्धा यवतमाळ,संभाजीनगर, बिड, जालना, अकोला जिल्हयातील उपासक आणि उपासिकांची उपस्थीती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल मेढे,सचिन झिने, विनय खराटे, गजानन जाधव, गणेश झोटे, सतीष पवार, संजय कस्तूरे, सुरेश सरकटे, संदीप मोरे,प्रमोद कंकाळ, सुनिल जाधव, दिपक मनवर,मनोज वाकोडे,प्रा.नागसेन वाकोडे, प्रा.शशिकांत जाधव आदींनी प्रयत्न केले.

You may have missed

error: Content is protected !!