मासरूळ शिवारात काळविटाची टक्कर एकाचा मृत्यू तर एकाला जीवदान!
चिखली( एकनाथ माळेकर ) बुलढाणा तालुक्यातील मासरूळ शिवारात दि.२९ ऑक्टोंबर रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास गणेश सावळे यांच्या शेतात दोन काळविटांमध्ये टक्कर सुरू होती टक्कर सुरू असताना सदर काळविटाच्या शिंगामध्ये शेतात पांगवलेले ठिंबक ची नळी अडकल्यामुळे टक्कर सुटणे अशक्य झाले ठिंबक नळी एवढी घट्ट अडकली जनु काही हाताने बांधली अशी सदर टक्कर कैटाच्या झाडाच्या फांदीत ठिंबक नळी अडकली आणि त्यातच एका काळविटाला फाशी लागली त्यात त्याचा मृत्यू झाला झाडातुन सुटका झाल्यावर मृत पावलेल्या काळविटाला अडकलेल्या काळविटाणे दुसऱ्या शेतात फरफटत नेले हे दृश्य येथील शेतकरी सुभाष शिंदे यांनी पाहिले असता तात्काळ वनविभागाची संपर्क साधला वनरक्षक व त्यांची टीम थोड्याच वेळात त्यांचे वाहन घेऊन हजर झाले त्यावेळी सदर शेतकरी व वनरक्षक कर्मचारी यांनी सदर काळविटाच्या शिंगात अडकलेले ठिंबक नळी विळयाच्या साह्याने कापली व त्यातून एका काळविटाची सुखरूप सुटका झाली तर एकाचा मृत्यू झालेल्या होता. मृत पावलेल्या काळ विटाला वनरक्षकाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वाहनात घेऊन गेली तर दुसऱ्या काळविटाला जीवनदान मिळाले व ते जंगलात निघून गेली. हा थरार सकाळी जवळपास तीन ते चार तास सुरू होता.
