किनगाव राजा पोलिस ठाण्यात पवन जयभाये विरोधात गुन्हा दाखल

18 (1)

सिंदखेडराजा( अनिल दराडे) सिंदखेडराजा तालुक्यातील लिगा देवखेड येथील गुन्ह्यातील आरोपी पवन प्रल्हाद जायभाये याने दिनांक 27/10/2025 रोजी 22/30 वा च्या सुमारास शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करू नये या उद्देशाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून PSI किनाराजा व बैल जोडी चोरणारे माझ्या मृत्यूस कारणीभूत आहेत असे बोलून कोणते तरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सदर आरोपी यांचे जबाब घेण्यासाठी फिर्यादी व पोका शिवाजी बारगजे असे गेले असता यातील आरोपीने स्वतःच्या मोबाईल वर एक व्हिडिओ चित्रित करून त्यामध्ये फिर्यादी सुभाष गिते व त्यांच्यासोबत गेलेले शिवाजी बारगजे व त्यांच्या सोबत एक जान असे तिघांनी आरोपीच्या घरी येऊन धमकी दिली तू जर ठाणेदार साहेबांच्या विरुद्ध जबाब दिला तर आम्ही तुझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करू असे बोलले. आरोपी याने जबाब दिला नाही अशा मजकुराचा व्हिडिओ आरोपी याने तयार करून व्हाट्सअप वर प्रसारित केला अशा प्रकारे फिर्यादी कायदेशीर रित्या त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी गेलेला असतानाही जबाब न देता एक व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोलिसांची प्रतिमा मलीन होणे व अप्रतिची भावना पसरविण्याचे काम केले आहे. अशा पो. कॉ. सुभाष गिते यांचे लेखी रिपोर्ट वरून पवन प्रल्हाद जायभाये रा. लिंगा याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास बीट पोहेका/विष्णू मुंडे बन.1245 यांच्याकडे देण्यात आला आहे.

You may have missed

error: Content is protected !!