अकोला कृषी विद्यापीठ युवक महोत्सव 2025 मध्ये समर्थ कृषी महाविद्यालयाचा उत्साही सहभाग
सिंदखेडराजा (अनिल दराडे) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या वतीने आयोजित युवक महोत्सव 2025 मध्ये समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.या युवक महोत्सवात विद्यार्थ्यांनी शोभायात्रा, माईम, भारतीय शास्त्रीय संगीत, रांगोळी, पेंटिंग, क्ले मॉडेलिंग, वादविवाद (डिबेट), प्रश्नमंजुषा (क्विझ) अशा विविध स्पर्धांमध्ये आपली कला, ज्ञान व प्रतिभेचे सुंदर दर्शन घडवले.
प्रसंगी कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे, डॉ. तांबे व डॉ. वाळके यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, प्रेरणा आणि उत्तम दिशा मिळाली. त्यांच्या सहकार्याबद्दल महाविद्यालय परिवार त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.
यामध्ये प्रेशीका जाधव (B.Sc. Agriculture) हिने On the Spot Painting स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले,
तर
🪔 प्रणव मांन्टे (B.Sc. Agriculture) याने Clay Modelling स्पर्धेत उपविजेतेपद मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढवला.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. नंदाताई कायंदे, सचिव श्री. सतीश कायंदे,
सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मा. मनोज कायंदे,
प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे,
टीम मॅनेजर प्रा. अरुण शेळके, तसेच
प्रा. अश्विनी जाधव व सर्व प्राध्यापक व कर्मचारीवृंद यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट शिस्त, सृजनशीलता आणि संघभावना प्रदर्शित केली.
युवक महोत्सवातील सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि सृजनशील दृष्टिकोन अधिक वृद्धिंगत झाला.
समर्थ कृषी महाविद्यालयाचे हे यश ग्रामीण भागातील तरुणांना “कृषी क्षेत्रात कला, ज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा समन्वय साधण्याची प्रेरणा” देणारे ठरले आहे.
