विद्यार्थ्याचा बळी घेणाऱ्या शिक्षकावर कारवाई कधीन्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबीयांचा टाहो

IMG-20251031-WA0021

नांदुरा :-(बुलढाणा माझा)चार महिन्यांपूर्वी तालुक्यातील वसाडी येथील विवेक महादेव राऊत या वर्ग १० मधील विद्यार्थ्याने शिक्षकाच्या त्रासामुळे आत्महत्या केली.याबाबत सविस्तर असे की वसाडी येथील जय बजरंग विद्यालय येथील सह शिक्षक गोपाल मारोती सूर्यवंशी ह्या शिक्षकाने विद्यार्थी विवेक महादेव राऊत यास आई वडीलावरुन शिवीगाळ करत सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसमोर अपमान केला.ही बाब विद्यार्थ्याचा जिव्हारी लागल्यामुळे त्याने आत्महत्या केली व चिठ्ठीमध्ये मी विवेक महादेव राऊत मी फाशी घेतो कारण की मला सुर्यवंशी मास्तर खुप बोलला तो माझ्या आई बाबांवरुन बोलुन गेला म्हणुन मी फाशी घेतो असे मृतक विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहुन ठेवले.यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले व गोपाल मारोती सर्यवंशी सह शिक्षक यांना विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या सिद्ध झाल्यामुळे ९० दिवसांसाठी मा. न्यालयाने या शिक्षकाला निलंबीत केले होते. अर्थातच या परिसरात येण्यासाठी बंधन घातले होते. परंतु दिवाळीच्या दहा दिवस अगोदर सदर शिक्षक परत शाळेवर आल्यामुळे विद्यार्थी वर्गात व पालकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. सदर शिक्षकाच्या या अगोदर सुद्धा अनेक तक्रारी असल्यामुळे सदर शिक्षकाला कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. या शिक्षकाच्या दहशतीमुळे शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. करीता शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सदर गोपाल मारोती सुर्यवंशी या शिक्षकाला कायम स्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे यासाठी मृतक विद्यार्थ्याचे कुटुंबिय व गावकऱ्यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी व ज्या संस्थेवर हा शिक्षक सेवेत रुजू आहे असे जय बजरंग विद्यालय वसाडी येथे निवेदनाच्या माध्यमांतून मागणी केली आहे

You may have missed

error: Content is protected !!