जिल्हा परिषद शाळा, चिंचपुर येथे बदली केलेले शिक्षक परत त्याच पदी मिळणेबाबत अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा…..
खामगाव (बुलढाणा माझा न्युज )तालुक्यातील चिंचपूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षकांची बदली केलेले शिक्षक परत मिळण्याबाबत चिचपुर येथील गणेश पुरुषोत्तम अंभोरे शाळा समिती अध्यक्ष यांनी सीओकडे तक्रार केलेली आहे.तक्रारीमध्ये त्यांनी म्हटले आहे की जि.प.म. पुर्व माध्य. शाळा, चिंचपुर येथे श्री निलेश विश्वंभर जाधव हे शिक्षक कार्यरत होते. मात्र शासनाकडुन त्यांची बदली करण्यात आलेली आहे. सदरह करण्यात आलेली बदली त्वरीत रदद करण्यात येऊन श्री निलेश विश्वंभर जाधव या शिक्षकांना त्याच शाळेवर पुर्नस्थापीत करण्यात यावे जेणे करुन विद्यार्थाचे शालेय नुकसान होणार नाही.
तसेच या शाळेवर आज रोजी शासनाकडुन ९ पदे मंजूर असुन फक्त ७ पदे कार्यरत असून २ पदे रिक्त आहेत. रिक्त असलेले २ पदे त्वरीत भरण्यात यावीत कारण शाळा नुकतीच सुरु झालेली आहे. त्यामुळे शालेय विद्याथ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. पालकवर्गाकडन मोठया प्रमाणात तक्रारी सुध्दा येत आहेत शिक्षक पदे येत्या ५ दिवसात भरण्यात यावीत.
असे न झाल्यास आम्हाला नाईलाजास्तव शाळेला ताला ठोको आंदोलन छेडावे लागेल व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसानीस शासन जबाबदार राहिल. अशे निवेदनामध्ये म्हटले आहे
