CIO कडून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ – 10 लाख झाडे लावण्याचा निर्धार…..

IMG-20250629-WA0007

पिंपळगाव राजा (बुलढाणा माझा न्युज )चिल्ड्रन इस्लामिक ऑर्गनायझेशन (CIO) तर्फे देशभरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत 25 जून ते 26 जुलै 2025 या कालावधीत दहा लाख झाडे लावणे व त्यांची निगा राखण्यासाठी देशातील मुलांना प्रेरित करण्याचा उद्देश आहे.

या अभियानाचा शुभारंभ जमाअत-ए-इस्लामी हिंद, पिंपळगाव राजा येथील मुख्यालयात करण्यात आला. उद्घाटन सोहळ्यात मोहम्मद जाहेद मोहम्मद शकील यांनी कुरआन पठण केले. लुबना इरम यांनी मुलांना वृक्षारोपणाचा हलफ दिला. कार्यक्रमात पौधे वाटप करण्यात आले आणि पुढील रविवारी इनामी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या प्रसंगी स्थानिक जमाअत-ए-इस्लामी हिंद अध्यक्ष मोहम्मद जियाउल्ला, CIO मॉनिटर मोहम्मद नजमुद्दीन तसेच इतर मान्यवर व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण पर्यावरणपूरक आणि उत्साही होते. CIO च्या या उपक्रमामुळे लहान वयातच पर्यावरणप्रेम रुजवले जाईल आणि हरित भारताच्या दिशेने ठोस पाऊल उचलले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

You may have missed

error: Content is protected !!