रिपाई आठवलेंचे बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदी पत्रकार बाबासाहेब जाधव यांची निवड
बुलडाणा( बुलढाणा माझा न्युज)- बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाच्या जिल्हासंपर्क प्रमुख पदी पतत्रकार बाबासाहेब जाधव यांची रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीयाचे राष्ट्रीयध्यक्ष तथा केंद्रीय समाजिक न्याय राज्य मंत्री भारत सरकाचे लोकनेते संघर्ष नायक डॅा. रामदासजी आठवले यांनी एका आदेशान्वये निवड केली. बुलडाणा जिल्ह्याचे बाबासाहेब जाधव हे 1976 पासून पॅंथर चळवळी पासून रामदासजी आठवलेंवर एकनिष्ठ प्रेम करणारे रिपाईचे कीतीक गट झाले आठवले साहेब सत्तेत असो या नसो पण त्यांच्या पाठीसी खंबीर पणे कशाचीही लालसा न ठेवता कंपाळी एकनिष्ठतेचे रिपाई आठवलेंचे कुंकु लाऊन स्वाभिमानाने एकनिष्ठ पणे राहत आज पर्यत आहे. 80 टक्के समाज कारण व 20 टक्के राजकारण करणारे, जिल्ह्यातील अनेक बुध्दविहारांना आर्थीक मदत करणारे, गरजू हेतकरू यांना तनमनधनाने मदत करणारे, कोवीड काळात विधव,गोरगरीब जनतेला घरपोच आर्थीक मदत करणारे,
सामाजीक , राजकीय, धार्मीक क्षेत्रात सदा आग्रेसर असणारे एसटी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे 1988 पासून ते 2014 पर्यंत बुलडाणा जिल्हाध्यक्ष तसेच दहावर्ष कास्ट्राईब राप कर्मचारी संघटनेचे राज्यउपाध्यक्ष, अनुसुचित जाती जनजाती परिसंघाचे जिल्हा कार्यध्यक्ष, एसटी महामंडळावर शासकीय सल्लागार राहीलेले, बुलडाणा जिल्हा मराठी पतत्रकार परिषदेचे जिल्हा मुख्यसंघटक बहूआयामी म्हणून पत्रकार बाबासाहेब जाधव हे सर्व जिल्हाभर पत्रकारिते, सामाजीक, राजकीय,धार्मीक, रिपाई,कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून शासन, प्रशासन व समाजात जिल्हाभर परिचित आहे.
1988 साली स्मृतीशेष देविदासजी साबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाउपाध्यक्ष म्हणून समर्थ साथ दिली नंतर 1994 साली महासचिव म्हणून साबळे यांनी नियुक्ती केली नंतर 2008 साली कार्यध्यक्ष पदी नंतर 2014 साली रिपाईचे जिल्हाध्यक्ष यांनी रिपाई सोडून गेले त्यावेळी जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली काही काळ पदावर असतांना संपूर्ण जिल्ह्यात रिपाईच्या शाखा कार्यकर्ते मेळावे कार्यकर्यांच्या सुखदु:खात धाऊन जाणे हे असतांना रिपाईची घोडदौड असतांना 2015 साली पून्हा कार्यध्यक्षपदी निवड केली अन्याय झाला असतांना सुध्दा आठवले साहेंबांवर एकनिष्ठ प्रेम असल्यामुळे अन्याय सहन करून कार्यध्यक्ष पद समर्थ सांभाळले पून्हा 2019 च्या लोकसभेच्या वेळी जिल्हाध्यक्ष यांनी पक्ष सोडून गेले परत जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली तीही सांभाळली परत 2020 साली पुन्हा कार्यध्यक्ष पदी निवड केली 2024 / 25 च्या विधान सभेच्या निवडनुकीच्या वेळेस जिल्हाध्यक्ष यांनी राजीनामा दिला पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दीली नंतर नविन व्यक्तीची जिल्हाध्यक्ष पदी निवड केली व पुन्हा जिल्हासंपर्क प्रमुख पदी निवड केली. सप्टेंबर 2025 मघ्ये नविन जिल्हाध्यक्षाला निलंबीत केले. नंतर 9 आक्टोंबर 2025 ला नविन जिल्हाध्यक्ष निवड करण्यात आली व पुन्हा 25 आक्टोंबर ला डॅा. रामदासजी आठवले यांच्या आदेशाव्दारे रिपाई प्रदेशकार्यध्यक्ष बाबुरावजी कदम यांच्या सहीने पुन्हा एकनिष्ठतेचा व जेष्ठतेचा अन्याय सहनतेचा भगवान गौतम बुध्दाचा प्रज्ञा,शिल, करूणा, दानपरिमिता अंगी बाळगणारे बाबासाहेब जाधव
यांचा पुन्हा विचार करून डॅा. रामदासजी आठवले साहेबांनी त्यांच्या आदेशान्वये पुन्हा रिपाई बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली. कोणताही मागचा पुढचा विचार न करता फक्त एकनिष्ठतेचा व नेत्याचा आदेश सिरसावध मानून पदभार स्विकारला.
रिपाईच्या जिल्हासंपर्क प्रमुख पदी निवड झाल्यामुळे आंबेडकरी चळवळीचे व डॅा. रामदासजी आठवले यांच्यावर प्रेम करणारे भिमरत्न पुरस्कार प्राप्त समाजभूषण भैयासाहेब
पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या बुलडाणा येथील राहते घरी सर्व प्रथम तथागत भगवान गौतम बुध्द,लोकराज्या छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य जोतीबा फुले,महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मेनबत्ती,आगरबती,पुष्पाने पुजा केले.
त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख पदी बाबासाहेब जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा
शाल, पुष्प गुच्छ व हार घालून मोठ्या जल्लोउत्साहात बुलडाणा जिल्हा रिपाईच्या वतीने सत्कार केला. यावेळी नविन जिल्हाध्यक्ष दिलीप खरात, विदर्भ महीलाध्यक्ष आशाताई वानखडे, जिल्हा युवाध्यक्ष महेंद्र इंगळे, बुलडाणा निरिक्षक रिपाई कोकनचे सचिव बिल्डर सतीष बोर्डे, जिल्हाउपाध्यक्ष दिलीप काकडे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नबाब मिर्झा, सर्वश्री तालुकाध्यक्ष बुलडाणा केशव सरकटे, चिखली हीम्मराव जाधव, मोताळा बाळासाहेब आहिरे, सिंदखेडराजा भानुदास शेजूळ, देऊळगावराजा प्रदिप मुखदयाल, मेहकर जिल्हाउपाध्यक्ष पंकज वाघ, जिल्हासरचिटनिस विजय साबळे, महीला नेत्या बोर्डेताई(कांबळे), बुलडाणा महीलातालुखाध्यक्ष उषाताई इंगळे, युवा नेते संदिप भालेराव, समाजसेवक रामभाऊदादा शिंदे,भिमशाहीर प्रविणदादा जाधव,पत्रकार झिने इत्यादी रिपाईचे असंख्य पदादिकारी कार्यकर्ते या सत्कार प्रसंगी हजर होते.
सुत्रसंचलन केशव सरकटे
यांनी केले तर आभार प्रदर्शन हिम्मराव जाधव यांनी केले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
