बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांतील गोंधळ व संशयास्पद मतदारांच्या नोंदींसंदर्भात मुंबई येथे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांची सविस्तर चर्चा !

IMG-20251101-WA0018

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ) विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या बनावट नोंदी, एका मतदाराचे दुबार नावे, मोठ्या प्रमाणात मयत मतदारांची नावे, एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नोंद तसेच नियोजनबद्ध पद्धतीने मोठ्या प्रमाणावर केलेल्या मतचोरीच्या तक्रारींचा तपशील युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आला.यावेळी शिवसेना ॲड. जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा मतदारसंघातील सद्यस्थितीबाबत आदित्यजी ठाकरे यांना सविस्तर माहिती देऊन मतदार याद्यांतील विसंगती, बोगस नावे आणि दुबार नोंदींमुळे लोकशाही प्रक्रियेवर निर्माण झालेला संशय दूर करणं अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.मतदान हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. त्यात फेरफार करण्याचा कुठलाही प्रयत्न लोकशाहीवर आघात आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे औपचारिक निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून स्थानिक पातळीवरही जनआंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.शिवसेना सदैव जनतेच्या न्यायासाठी कटिबद्ध आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा आवाज दडपण्याचा कुठलाही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा ठाम विश्वास यावेळी युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी व्यक्त केला !

You may have missed

error: Content is protected !!