ए एस पी पथकाची जुगारावर धाड,शेगावात सुरू होता जुगार,तब्बल 62 लाखांचा मुद्देमाल जप्त,तर 61 जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल ..
शेगाव( बुलढाणा माझा न्युज )बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव उपविभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या पथकाने काल रात्री शेगावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली असता त्या ठिकाणावरून तब्बल 62 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 61 जुगारीवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे मात्र , अवैध धंदे करणाऱ्या मध्ये मोठी खळबळ उडाली खामगाव ते शेगाव रोडवरील आदर्श रिसॉर्ट मध्ये अनेक दिवसापासून राजेरोजपणे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रोणिक लोढा यांच्या पथकाला मिळाली होती. वास्तविक जिल्ह्यात येताच लोढा यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते . यानंतर काही प्रमाणात अवैध धंदे बंद सुद्धा झाले , मात्र अद्याप काही ठिकाणी अवैध धंदे सुरूच आहे . त्यातील हा एक जुगाराचा अड्डा असून याची माहिती मिळतच पथकाने या जुगारावर धाड टाकली असता नगदी 17 लाख 52 हजार 320 रुपयांसह 12 चारचाकी वाहन, 5 मोटरसायकल, 52 मोबाईल असा एकूण 65 लाख रुपयांचा मुद्देमाला जप्त केला आहे .. हा जुगाराचा अड्डा शेगाव शहर पोलिसांच्या हद्दीत सुरू असल्याने शेगाव शहर पोलिसात 61 जुगारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये काही प्रतिष्ठित लोकांची नावे सुद्धा असल्याचे समोर आले आहे.मात्र अवैध धंद्यावर बंदी असताना ही पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा जुगार चालू होता, हे विशेष ..
