शेतकऱ्याची शेतातील अवजारे चोरणाऱ्या दोघांना पकडले स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ट्रॅक्टर ट्रॉली व रोटावेटर असा 6,90,000 रुपयाचा मुद्दामाल जप्त, पोलीस स्टेशन अंढेरा येथील 2 गुन्ह्याची उकल…..
देऊळगाव राजा (एकनाथ माळेकर ) देऊळगाव राजा तालुक्यातील सरंबा येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतातून चोरट्यांनी ट्रॅक्टर, ट्रॉली व रोटावेटर असा 6,90,000 मुद्देमाल चोरून नेला होता याबाबत सरबा येथील पवन शिवदास चेके व विकास संपत चेके राहणार सरंबा यांनी अढेरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मा. श्री. निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. या अनुषंगाने श्री सुनील अबुलकर स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून त्यांना अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांचे चोरी गेलेली अवजारे हस्तगत करणे बाबत सूचना केल्या होत्या त्यावेळेस पथकाने सखोल चौकशी दरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपी गणेश आत्माराम वायाळ वय (वर्ष 38)रा सावरखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना
व अमोल सुरेश शेवत्रे वय (वर्षे 33)रा ब्रह्मपुरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना यांच्या ताब्यातून ट्रॅक्टरची ट्रॉली किंमत 75,000/- रोटावेटर किंमत 65,000 ट्रॅक्टर किंमत 5,50,000 असा एकूण 6,90,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई मा.श्री. निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर श्री. श्रेणिक लोढा-अपर पोलीस अधीक्षक खामगांव, श्री. अमोल गायकवाड-अपर पोलीस अधीक्षक- बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. सुनिल अंबुलकर यांचे नेतृत्वात ASI ओमप्रकाश सावळे, पोहेकॉ. दिगंबर कपाटे, मपोहेकॉ. वनिता शिंगणे, पोकॉ. दिपक वायाळ, मनोज खरडे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पोकॉ, कैलास ठोंबरे तांत्रिक विष्लेषण विभाग बुलढाणा यांचे पथकाने केली
