काम सुरू करा अन्यथा उपोषण. रवींद्र काकडे शिवसेना नेते…
चिखली( एकनाथ माळेकर) चिखली मधील प्रभाग क्रमांक 12 गजानन नगर येथील नालंदा चौक या ठिकाणी चिखलीच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी उपरोक्त ठिकाणी रस्त्याचे भूमिपूजन केले आहे परंतु आतापर्यंत त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही या रस्त्या संदर्भात 10 मार्च 2025 रोजी आमरण उपोषणाचे तक्रार सुद्धा स्थानिक प्रशासनाकडे दिली होती तसेच 9 सप्टेंबर 2025 रोजी तालुका युवा सेना यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समस्त शिवसैनिक यांनी याबाबत निवेदन सादर केलेले आहे परंतु अद्याप पर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम सुरू झाले नाही स्थानिक प्रशासनाने आम्हाला काम सुरू करतो म्हणून सांगितले परंतु आजपर्यंत सुद्धा सदर ठिकाणी बांधकामाला सुरुवात झालेली नाही त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे सदर निवेदनामध्ये स्थानिक प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अवगत केलेले होते तरीसुद्धा स्थानिक प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेतली नाही . 3 नोव्हेंबर 2025 सोमवार पासून आम्ही उपोषणाला बसणार आहे दलित वस्ती बुद्ध विहारा कडे जाणारा रस्ता जालना हवेच्या बाजूला सदर ठिकाणी शिवाजी शिराळे विजय खरात अर्जुन बोर्डे सचिन मोरे रवींद्र काकडे हे सदर ठिकाणी उपोषणाला बसणार आहे.
