श्रीक्षेत्र केशव शिवणी येथे कार्तिकीच्या मुख्य पर्वावर श्री केशवराज विष्णु भगवान यांची चतुर्भुज शंख चक्र गदा पद्म अशा विविध शैलीमध्ये असलेल्या मूर्तीचा महा अभिषेक संपन्न

IMG-20251102-WA0060

सिंदखेडराजा (अनिल दराडे). सकाळी ब्रह्म मुहूर्तावर पाच वाजेला अभिषेक महापूजेस प्रारंभ झाला मंदीर संस्थांनचे विश्वस्त तथा अध्यक्ष श्री वसंतराव नारायणराव उदावंत यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा संपन्न झाली . दही दूध मद व गंगेच्या जलाने मूर्ती महा अभिषेक करण्यात आला . देवाला शोडोपचारे नैवेद्य अर्पण करण्यात आला. धूप दिप लाऊन देवाची महाआरती करण्यात आली. श्रीक्षेत्र केशव शिवणी येथे चार दगडी हेमाडपंथी कोरीव शिल्प असलेली मंदिर ग्रामस्थांच्या पुढाकाराने चारही मंदिराचे काम पूर्ण झाले असून, त्यामध्ये भगवान विष्णू केशवराज ,श्री ज्ञानेश्वर माऊली ,संत मुक्ताबाई ,संत नरहरी महाराज ,जगत पिता श्रीराम प्रभू, पार्वती माता,गणराज गणपती, शंकर भोलेनाथ आदी करून मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा ग्रामस्थांच्या पुढाकाराने याच वर्षी संपन्न झाला .अनेक संत महंत गुंणीजन मंडळींच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली. दगडी हेमाडपंथी चिरेबंद आकर्षक कलाकृतींनी नटलेली ही चारही मंदिर मनाला मोहुन टाकतात. दगडी शैलेतील हेमाडपंथी स्वरूपाची रचना असलेल्या या मंदिरामध्ये मुर्त्या मनाला मोहुन टाकतात. गेल्या 23 वर्षापासून या ठिकाणी श्रीराम नवमी उत्सव नामसप्ताह संपन्न होत असतो. भजन कीर्तन अन्नदान या संस्थांनची मुख्य परंपरा आहे. कृष्णा शीला दगडातील श्री केशवराज यांची पूर्णाकृती मूर्ती मधील भाव मनाला मोहून टाकततो . ग्रामस्थांच्या संकल्पनेतून सर्व मंदिराची कामे पूर्णत्वास आले आहे .दररोज देवाला स्नान संध्या दोन वेळेस देवाची आरती व नैवेद्य ही परंपरा कायम आहे. आज कार्तिकीच्या मुख्य पर्वावर महाभिषेकासाठीज्ञ संस्थांनचे विश्वस्त, गावचे सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष, शिक्षण समितीचे अध्यक्ष ,गावचे पोलीस पाटील, पत्रकार बांधव, आदीकरून ग्रामस्थ व महिला व भाविक भक्त हजर होते.

You may have missed

error: Content is protected !!