भक्तीत समर्पण भाव असावा लागतो.- परमपूज्य स्वामीजी.
निलेश कोल्हे
चिखली :- परमपूज्य परमहंस परिवराजकाचार्य स्वामी श्री हरि चैतन्य आनंद सरस्वती जी महाराज यांची कीर्तन रुपी सेवा ‘दीपोत्सवा निमित्त’ शेलोडी येथे पार पडली. नाचू कीर्तनाचे रंगी/ज्ञानदीप लावू जगी//या अभंगावर निरूपण करताना ते म्हणाले की, संत शिरोमणी नामदेव महाराजांनी समाजात विचार रुपी ज्ञानाचे दीप लावून समाजातील अंधश्रद्धा, रूढी ,परंपरा ,नष्ट करून परमेश्वरा प्रति समर्पण भाव भक्तीत असेल तर ईश्वराला प्राप्त करता येते. भक्तीत निष्ठा असणे आवश्यक आहे. याकरिता अज्ञान रुपी अंधकार नष्ट होण्यासाठी विचार रुपीज्ञान बोध व्हावा लागतो. देवधर्माला ग्लानी आल्यास अवतार घेऊन सज्जनांचे संरक्षण व दुर्जनांचे निर्दलन करतो. तर संत धर्माचे पालन करून समाजाचा उद्धार करतात. संतांचे जीवन दिव्य अनुभवाची प्रचिती देणारे असते. संत लोक जीवनातील भक्तीची गंगा अखंड वाहत ठेवून अज्ञानी लोकांचे ज्ञानी लोकात रूपांतर करत आहेत.
” मी अविवेकाची काजळी/ फेडुनी विवेक दीप उजळी/ती योगिया दिवाळी पाहे निरंतर//संतांचे जीवन लौकिकांकडून अलौकिकाकडे नेणारे असते. याप्रसंगी भाविक भक्त दीपोत्सवाच्या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी वसंतराव गायकवाड, जगन्नाथ सकुंडे, रामधन शेवाळे, तुलसीदास नेमाने, संजय घाडगे आणि समस्त गावकरी लोकांनी अथक परिश्रम घेतले.
