शेतकरी महिलांसाठी आझाद हिंदच्या रणरागिन्या सज्ज : रमाबाई गोरे.मोताळा तालुका अध्यक्षपदी रमाबाई गोरे यांची नियुक्ती…
निलेश कोल्हे
बुलढाणा:- मोताळा तालुक्यातील शेतकरी आणि महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आझाद हिंद ची महिला ब्रिगेड मोताळा तालुक्यात अग्रेसर राहील. मोताळा तालुक्यातील शेतकरी, महिला आणि जनसामान्यांचा समस्या सोडवण्यासाठी आझाद हिंदच्या रणरागिण्या सज्ज राहतील,असा दृढ विश्वास नवनिर्वाचित मोताळा तालुका अध्यक्ष रमाबाई गोरे यांनी व्यक्त केला आहे.
मोताळा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या थळ येथील सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर राहणाऱ्या बहुजन चळवळीतील रणरागिनी रमाबाई गोरे यांच्या भरीव कार्याची नोंद घेत जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील यांच्या सूचनेवरून रमाबाई गोरे यांची आझाद हिंद महिला संघटनेच्या मोताळा तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
आझाद हिंद च्या नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये सदर नियुक्ती आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे यांच्या स्वाक्षरीने प्रदान करण्यात आली. यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे पाटील, प्रदेश महासचिव संजय येंडोले, विदर्भ प्रदेशाध्यक्ष श्रीकृष्ण भगत यांच्यासह जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील, कार्याध्यक्ष राम व्यवहारे, ग्राम स्वराज्य समितीचे संयोजक भूपेश पाटील, कमलाकर व्यवहारे,उल्हास काकर, राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष सुशांत पाटील, आझाद हिंद महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रमिलाताई सुशीर, आझाद हिंद कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश नरवाडे,रमाई ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष भारतीताई अवचार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
