डोंगर शेवली येथील ग्रामपंचायत अधिकारी व्हीएस शेळके यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्रदान

IMG-20251103-WA0021

चिखली (गजानन दसरकर) चिखली तालुक्यातील डोंगर शेवली येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक विजय शालिग्राम शेळके यांना सन 2025 मध्ये आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहे विजय शेळके हे सन 2005 मध्ये ग्रामसेवक म्हणून डोंगर शेवली या गावांमध्ये रुजू झाले 2005 ते 2014 पर्यंत त्यांनी नऊ वर्ष डोंगर शेवली गावामध्ये चांगली सेवा दिली त्यानंतर 2014 ते 2023 पर्यंत डासाळा व तोरण वाडा ह्या दोन ग्रामपंचायतींनी चांगल्या रीतीने सांभाळल्यामुळे त्यांना 2021 ते 2022 चा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला सन 2023 पासून व्हीएस शेळके हे पुन्हा डोंगर शेवली या गावात रुजू झाले ते आज पर्यंत डोंगर शेवली येथेच कार्यरत असताना त्यांना पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आले त्यांनी Batch शेवली तोरणवाडा व डासाळा या गावांमध्ये चांगली सेवा दिल्यामुळे तिन्ही गावातून त्यांचे वर अभिनंदन आजचा होत आहे सदर पुरस्कार बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील आणि सह पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार सन 2017, 18 मध्ये आनंद शेषराव पाटील 2018,/19 मध्ये विनायक छगनराव वायाळ 2019,20 मध्ये महेश रामकृष्ण राजपूत2020 2,021 प्रशांत गुलाबराव जाधव 2021 22 मध्ये विजय शालिग्राम शेळके 2022 /23 मध्ये समाधान विष्णू पडघान सध्या तोरणमाळ येथे कार्यरत असलेले आणि 2023 / 24 मध्ये दीपक वाघजी गिरे यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सदर पुरस्कार सोहळा दिनांक 2 नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी राधा गोविंद मंगल कार्यालय चैतन्य वाडी येथे सकाळी 11 वाजता पार पडला असून सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे डोंगर शिवली वाशी यांनी मनापासून अभिनंदन केले असून सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

You may have missed

error: Content is protected !!