चिखली महसूल विभागाचा सावळा गोंधळ वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज,टॉप टेन ची महसुल विभागाची परंपरा या वेळेस मोडीत निघणार !
चिखली( एकनाथ माळेकर) चिखली महसुली विभागाचे एक नाही अनेक असे कर्मचारी आहेत की ते त्यांच्या अधिकाराचा आणि कर्तव्याचा बेजबाबदारपणे वापर करत आहे आणि त्याचा परिणाम सर्व सामान्य जनतेवर होत आहे या महसूल विभागाचे परंपरा ही अनेक वर्षापासून चालत आलेली आहे त्यामध्ये आज रोजी सिंदखेडराजा येथे कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी खडसे साहेब असो त्यानंतर सुरेश कव्हळे आणि मागील वर्षी विद्यमान तहसीलदार संतोष काकडे असो यांनी चिखली महसूल विभाग हे महाराष्ट्रातून टॉप टेन मध्ये आणले होते परंतु त्याला आता सुरुंग लागला आहे त्यामुळे चिखली महसूल विभागाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव खराब झाले आहे याला येथील जे महसूल विभागाचे कर्मचारी आहे हे कारणीभूत आहे त्यामुळे चिखली महसूल विभागाचे नाव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये खराब झाले आहे चिखली मध्ये सध्या बहुचर्चित असलेले भूखंड विषयावर चालू असलेले प्रकर असो किंवा ग्रामीण भागातील महसूल अधिकारी असो यांनी चिखली महसूल कार्यालय चिखली याला बदनाम केले आहे चिखली तालुक्यातील नायब तहसीलदार यांचे प्रकरण असो किंवा कर्तव्यावर हजर नसणारे अंत्री खेडेकर येथील तलाठी विजय खरात असो हे चिखली महसूल ला लागलेली कीड आहे यांच्यामुळे चिखली महसूल चे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खराब होत आहे तसेच महसूलविभागातील पुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे मेरा खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानदार आसो दीपावली संपल्यानंतर मेरा खुर्द येथील ग्रामस्थांन धान्य मिळाले आहे हे तेथील राशन दुकानदार हे कोणाच्या भरोशावर मनमानी करतात सणासुदीच्या दिवसाला जर ते राशन वेळेवर वाटत नसतील तर इतर वेळेस काय करत असतील अशी शंका उपस्थित होत आहे त्यांच्यामध्ये हि हिंमत कुठून आली आहे. राशन दुकान हे संपूर्ण महिना खुले ठेवण्याचे आदेश असताना सुद्धा ग्रामीण भागामध्ये फक्त एक किंवा दोन दिवस राशन दुकान उघडे असून इतर दिवशी सतत बंद असतात त्यांच्याकडे सुद्धा पुरवठा विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे त्यांच्या कारभार ऑनलाईन झाला आहे त्यांनी सदर माल आज पर्यंत किती दिवसांमध्ये वाटप केला आहे किंवा फक्त दोन किंवा तीन दिवसात विकण्याची आदेश त्यांना कोणी दिली आहे याची सुद्धा चौकशी करण्यात यावी आज सर्व ऑनलाईन झाले आहे त्यांनी सदर माल दीपावली झाल्यानंतर वाटप केला आहे जर सणासुदीला हे असं करत असतील तर इतर वेळेस काय याची सुद्धा चौकशीची मागणी मेरा खुर्द येथील नागरिक करत आहे.
