समाजरत्न पुरस्काराने ॲड.सतीशचंद्र रोठे सन्मानित.कार्तिकी एकादशीच्या पर्वावर सन्मान स्वतंत्र कामगार संघटनेच्या वतीने पुरस्कार प्रदान…..

IMG-20251104-WA0004

निलेश कोल्हे

बुलढाणा :- कामगार तथा शेतकरी,सामाजिक क्षेत्रात मागील 30 वर्षापासून निस्वार्थ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे पाटील यांना कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वावर दोन नोव्हेंबरला राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार – 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे.
स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट समाजसेवकांना दिला जाणारा समाजरत्न पुरस्कार बुलढाणा स्थित आझाद हिंद च्या कार्यालयात जाऊन स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेख युनुस तथा महाराष्ट्र राज्याचे मार्गदर्शक हभप मधुकरराव इंगळे यांच्या हस्ते प्रदान करीत ॲड रोठेना सन्मानित करण्यात आले.
यावेळी बुलढाणा येथील शिवस्मारक समितीचे संस्थापक राजेश हेलगे, रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे, आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या अध्यक्षा आशाताई गायकवाड, ग्राम स्वराज्य समितीचे संयोजक कमलाकर व्यवहारे, भूपेश पाटील,आझाद हिंद चे प्रदेश महासचिव संजय येंडोले,जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राम व्यवहारे, महिला जिल्हाध्यक्ष प्रमिलाताई सुशीर, भारतीताई अवचार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

ॲड.सतीशचंद्र रोठे यांचे उल्लेखनीय कार्य.
महाराष्ट्रातील कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र न देण्याचा ठराव ग्रामसेवक संघटनेने घेतला त्यामुळे कामगारांना प्रमाणपत्र देण्यात येत नव्हते. त्यावर अविरत संघर्ष में लढा देऊन कामगारांना प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश पारित करून घेतला. महाराष्ट्रात सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी रोही रानडुक्कर मारण्याची परवानगी मिळून दिली. शेत पांदण रस्ते खुले करण्यासाठी अध्यादेश पारित करून घेतले.जिल्ह्यातील अवैद्य धंदे बंद केले. प्लास्टिक मिक्स कागदी चहाच्या कपावर प्रथमच बंदी आणून दाखवली. अशा असंख्य सामाजिक, कामगार शेतकरी उपक्रमांमध्ये ॲड रोठे तीस वर्षापासून सदैव कार्यरत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!