विनायक वायाळ यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्रदान
चिखली (एकनाथ माळेकर )महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या वतीने विनायक छगनराव वायाळ यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना सन 2018- 19 मध्ये त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यांनी ग्रामपंचायत मलगी या गावची निवड तालुका स्तरावर स्मार्ट ग्राम म्हणून करणे, गाव 100% ODF करणे, गाव शंभर टक्के गटार मुक्त करणे (भूमिगत नालीची कामे), शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे गावामध्ये राबविणे व लोकांना त्याचा लाभ मिळवून देणे, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा मुदतीतच व वेळेवर देणे, प्रशासन व ग्रामपंचायतचे लोकप्रतिनिधी यांचा योग्य समन्वय ठेवून कामे पार पडणे अशाप्रकारे विविध प्रकारची कामे त्यांनी गाव स्तरावर केली होती व त्याची दखल घेऊनच त्यांना जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडून सन 2018- 19 साठी चा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला होता. या पुरस्काराचे वितरण दिनांक 2 नोव्हे 2025 ला जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये माननीय ना.प्रतापरावजी जाधव, (केंद्रीय मंत्री आयुष, आरोग्य कुटुंब कल्याण भारत सरकार), तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गुलाबरावजी खरात साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिषजी पवार साहेब, श्री शिवशंकरजी भारसाखळे, गट विकास अधिकारी समाधानजी वाघ, आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये या पुरस्काराचे प्रदान करण्यात आले.
विनायक वायाळ यांनी आदर्श ग्रामपंचायत अधिकारी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि म्हणाले हा पुरस्कार माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे माझ्या कामाची दखल प्रशासनाकडून घेतली गेली याचा मला आनंद आहे या या सन्मानामुळे मला भविष्यात अधिक चांगले काम करण्यासाठी ची प्रेरणा मिळाली आहे. या सन्मानासाठी त्यांनी जिल्हा परिषद बुलढाणा प्रशासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी, जिल्हा व तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटना चे अध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकारी तसेच सरपंच,उपसरपंच, व कार्यकारणी ग्रामपंचायत मलगी तसेच गावकरी मंडळी मलगी यांचे आभार मानले.
