चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांची बदली.. ( चिखली पोलीस स्टेशनची धुरा भुषण गावंडे यांच्या खांद्यावर )

IMG-20251105-WA0004

चिखली :- ( निलेश कोल्हे)
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची घोषणा होताच आज बुलडाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी १८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे.

यामध्ये चिखली पोलीस स्टेशनचे डॅशिंग, आणि कमी वेळेत चिखली करांच्या मनावर अधिराज्य करणारे ठाणेदार संग्राम पाटील यांची देखील बदली करण्यात आली. ठाणेदार संग्राम पाटील यांची बदली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस स्टेशन येथे झाली, तर त्यांच्या जागेवर नवीन ठाणेदार म्हणून भूषण गावंडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे वृत आहे. भूषण गावंडे हे पासपोर्ट शाखा बुलडाणा येथे कार्यरत होते. ते आता चिखली पोलीस स्टेशन येथे ठाणेदार म्हणून काम पाहतील.

You may have missed

error: Content is protected !!