जि. प. हायस्कूल सावरगाव चा माणस शालेय तलवारबाजीत राज्यस्तरावर

IMG-20251105-WA0003

चिखली:- ( निलेश कोल्हे) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा व जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा आणि बुलढाणा जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या अमरावती विभागीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा, जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा येथे पार पडल्या सदर स्पर्धेत जिल्हा परिष द हायस्कूल सावरगाव डुकरे ता. चिखली चा खेळाडू मानस गजानन लामखडे ( १४ वर्षे वयोगट ) विभागीय तलवारबाजी स्पर्धेत इपी या प्रकारात खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ह्या स्पर्धा दि. १२ ते १४ नोव्हेंबर २०२५ ला विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परीसर, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होत आहे.
त्याच्या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, अनुराधा सोळंकी क्रीडा विकास अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी राजेजाधव, सचिव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शेषनारायण लोढे, मयूर बाहेकर, युवराज भुसारी, गजानन गायकवाड माधव मंडळकर, शुभम सुरडकर यांनी अभिनंदन केले. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय अक्षय गोलांडे, नितीन जेऊघाले सर, एल. आर. वायाळ सर, तसेच आई वडील यांना दिले आहे.

You may have missed

error: Content is protected !!