अंत्रीखेडेकर येथील कांदा उत्पादक शेतकरी वाऱ्यावर. महसूल अधिकारी विजय खरात यांचा निष्काळजीपणा.
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे अंत्रीखेडेकर येथील कांदा उत्पादक शेतकरी हा अनेक वर्षापासून आपल्या शेतीमध्ये कांदा बीज उत्पादनाचे काम करत आहे अंत्री खेडेकर येथील अनेक शेतकरी हे कांदा बीज उत्पादक शेतकरी म्हणून संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे त्यामध्येच मागील सीजन मध्ये अंत्री खेडेकर येथे अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीचे पंचनामे सुद्धा झाले होते कृषी सहाय्यक किंगरे व महसुल अधिकारी विजय खरात यांनी संयुक्त पंचनामे सुद्धा केले होते कृषी सहाय्यक किंगरे यांनी पंचनामा करून सदर माहिती महसूल विभागाचे महसूल अधिकारी विजय खरात यांना दिली होती झालेल्या नुकसानीचे पंचनामाची यादी महसूल अधिकारी विजय खरात यांच्या कडे सपूत केली होती परंतु महसुल अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी यांना अजून पर्यंत अतिवृष्टीचे कांद्याचे अनुदान मिळाले नाही महसूल अधिकारी विजय खरात निष्काळजीपणाने शेतकऱ्याचे काम करत असल्यामुळे अजून पर्यंत अंत्री खेडेकर येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही अंत्री खेडेकर येथीलच काही शेतकरी शेतकऱ्यांची शेती ही मेरा खुर्द शिवारात मध्ये आहे व इतर शिवारामध्ये आहे तेथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे कांद्याचे अनुदान मिळाले आहे परंतु अंत्री खेडेकर येथील एकही शेतकऱ्याला अनुदान मिळाले नाही त्यामुळे अंत्री खेडेकर येथील कांदा उत्पादक शेतकरी यांनी महसुल अधिकारी विजय खरात यांच्या विषय नाराजी व्यक्त केली आहे सिंदखेडराजा विधानसभेचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी याबाबत चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांच्याशी संपर्क साधला असता अंत्री खेडेकर येथील शेतकऱ्याचे अनुदान लवकरात लवकर टाकण्यात येईल अशी माहिती संतोष काकडे यांनी डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना दिली आहे जर अनुदान लवकरात लवकर मिळाले नाही तर अंत्री खेडेकर येथील महसूल अधिकारी विजय खरात यांच्या विरोधात लवकरात लवकर उपोषण करण्यात येईल असे माहिती अंत्री खेडेकर येथील भागवत खेडेकर व इतर शेतकरी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली आहे
