अंढेरा पोलीस उपनिरीक्षक सुरेश जारवाल यांची बदली
दे/राजा (एकनाथ माळेकर )देळगाव राजा तालुक्यातील आणि चिखली तालुक्यातील बरेच गावे अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येथे असलेल्या अंढेरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश जारवाल यांचे अंढेरा पोलीस स्टेशन येथून उपविभागीय पोलीस अधिकारी देळगाव राज्य येथे बदली झाली आहे पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा यांच्या पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार ही बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक दिनेश जगन्नाथ घुगे यांची खामगाव शहर येथून अंढेरा पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार बदली करण्यात आली आहे. सुरेश जारवाल यांचे अंढेरा पोलीस स्टेशन येथे दोन वर्ष कम्प्लिट झाल्यामुळे बदली करण्यात आली आहे सुरेश जारवाल एक प्रशासकीय अधिकारी असून सुद्धा त्यांचे अंढेरा पोलीस स्टेशन मधील अनेक पत्रकार असो सर्वसामान्य लोक असो सामाजिक कार्यकर्ते असो यांचे यांच्याशी सलोख्याचे संबंध होते त्यामुळेच त्यांचे दोन वर्ष अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये कसे गेले हे सर्व सामान्य जनतेला तसेच त्यांनाही कळले नाही .
