Screenshot_2025-11-06-19-02-13-04_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7


मेहकर (एकनाथ माळेकर) मेहकर तालुक्यातील सुभानपर येथील शेतकरी श्री रामराव कोंडु सांगोळे वय ७५ वर्षे हे दि.२ नोव्हेंबर वार रविवार पासुन आपल्या राहत्या घरातुन कोणालाही न सांगता निघून गेलेले आहेत.सुभानपुर येथील एक सधन शेतकरी म्हणून त्यांना परिसरात ओळखले जाते होते.गेल्या चार दिवसांपासून त्यांचा सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला असता मिळुन आले नाहीत.त्यांचे घरात कोणासोबतही भांडण किंवा वाद झालेला नसुन वयोमानाने हा परिणाम झाल्याचे दिसून येते.
त्यांनी पांढऱ्या रंगाचा नेहरू शर्ट,पांढरी धोती आणि गांधी टोपी परिधान केलेली असुन कोणालाही सदर व्यक्ती दिसल्यास त्यांनी तात्काळ सुभानपुर येथील मधुकर सांगोळे ९६८९४५१६६१ तसेच गणेश सांगोळे ९६२३१९५३५६ तसेच खामखेड मेहकर येथील दगडु माणिकराव जंवजाळ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

You may have missed

error: Content is protected !!