बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार भुमराळा गावात भितीचे वातावरण….
लोणार (एकनाथ माळेकर) लोणार तालुक्यातील
मौजे भुमराळा येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष शिवाजी काळे यांच्या मालकीच्या शेतात रात्री गाय बांधून ते घरी गेले सकाळी सहा वाजता शेतात गेले असता त्यांना त्यांची गाय मृत्यू अवस्थेत दिसली, व तोंडाचा भाग सर्व खायल दिसला त्यांनी जवळ जाऊन निरीक्षण केले असता त्यांच्या निदर्शनी वेगळेच आले की त्यांच्या गाईवरती बिबट्यांनी हल्ला केला, त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत तात्काळ गावात फोनवरून कळविल, नंतर वन विभागाला, कळविण्यात आले,वनविभागाचे कर्मचारी तात्काळ येऊन पंचनामा केला व पायाचे ठसे पाहताच हा बिबट्याचं होता त्यांच्या लक्षात आले आणि वनविभागाच्या वरिष्ठांना कळविले,
गावातील सर्व नागरिक भियभीत झालेले आहे तरी शासनाने यावर लवकर काहीतरी उपाय करून बिबट्याला जेरेबंद करावे अशी भुमराळा गावकरी मागणी करत आहे
