जंगली प्राण्यापासून होणाऱ्या हाल्यापासून सुरक्षेसाठी वनरक्षक वनपाल यांना सुरक्षा पूर्वा गजानन पोटे जिल्हाध्यक्ष वनपाल संघटना.

IMG-20251106-WA0031

बुलढाणा( एकनाथ माळेकर) बुलढाणा जिल्ह्यातील वनपाल आणि वनरक्षक यांच्यावर होणारे हल्ल्यापासून सुरक्षा मिळवण्यासाठी 6 नोव्हेंबर2025 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक बुलढाणा कार्यालय समोर वनरक्षक- वनपाल कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून महाराष्ट्र मध्ये ठिक ठिकाणी मानव वन्यजीव संघर्षामुळे वनकर्मचाऱ्यांवर होत असलेल्या हल्यांचा जाहीर निषेध बुलढाणा वनविभागातील वनकर्मचारी यांनी केला आहे.
काळ्या फिती लावून निषेध करण्यामागचा उद्देश असा आहे की… भविष्यात पुन्हा अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये या साठी महाराष्ट्र शासनाने ठोस उपाययोजना करण्यात यावे… जेणेकरून मानव वन्यजीव संघर्षामुळे वनकर्मचाऱ्यांवर हल्ला कोणी करणार नाही….
महाराष्ट्र वनरक्षक- वनपाल संघटना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गजानन पोटे तसेच संघटना पदाधिकारी व वनरक्षक वनपाल कर्मचारी उपस्थित…..

You may have missed

error: Content is protected !!