तादुळवाडीअंगणवाडी केंद्रात विद्यार्थीदिन उत्साहात साजरा
सिंदखेडराजा( अनिल दराडे )तांदूळ वाडी(ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी रूम्हणा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तीपुळवाडी येथील अंगणवाडी केंद्रात “विद्यार्थी दिवस” मोठ्या उत्साहात, आनंदी आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जांभोरा गावचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्री. लांडगे साहेब यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून तांदुळवाडी येथील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. बाबासाहेब आढाव उपस्थित होते. मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला तांदुळवाडी व परिसरातील अनेक मान्यवर ग्रामस्थांनी उपस्थिती लावली. त्यामध्ये माजी पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रकाश खरात, श्री. विजय काळे, श्री. सुधाकर खरात, श्रीमती सखूबाई काळे, श्रीमती शशिकला खरात, श्रीमती दुरुबाई खरात, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी प्रतीक काळे, शाळकरी विद्यार्थी पंकज काळे, सागर इंगळे, हर्षदा काढे, कधिन्नूर खरात, राजवीर काळे आदींचा सहभाग होता.
या प्रसंगी श्री. विजय काळे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थीदिनाचे महत्त्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच पं. जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचे स्मरण करून विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी प्रेरित केले.
कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट स्वरूपात प्रमुख अतिथींच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका सौ. प्रिया तुजकोर (प्रकाश खरात) आणि मदतनीस सौ. साधना राजरत्न खरात यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रिया तुजकोर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. साधना खरात यांनी सादर केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
