शेंदुर्जन येथे खुलेआम जुगार चालू एसडीपीओ ला दिसतात साखरखेर्डा ठाणेदार यांना दिसत नाही का? शेंदुर्जन येथील जुगार अड्ड्यावर छापा,२५ हजाराचा ऐवज जप्त आठ आरोपींना अटक , एक फरार….
सिंदखेडराजा( एकनाथ माळेकर) सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत खुलेआम चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर मेहकरचे एस डी पी ओ संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत शेंदुर्जन येथे जुगार चालत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांना मिळताच त्यांच्या पथकाने आज दुपारी पाच वाजता छापा टाकला असता २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात आरोपींना अटक केली आहे तर एक फरार झाला आहे .
शेंदुर्जन येथे वरली मटका , अवैध दारू विक्री , तसेच जुगार तास पत्ते चालत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांना मिळाली . त्यांच्या पथकाने आज सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास छापा टाकला असता डावातील १४ हजार ३२० रुपये नगदी , तीन मोबाईल १० हजार ५०० , चटई १०० रुपये असा एकूण २४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . गणेश भगवान फड पोलिस कर्मचारी यांच्या तक्रारीवरून आरोपी रमेश शिवाजी शिंगणे वय ४८ , सदाशिव सखाराम नागरे ४० , बाळाराम प्रकाश परसने ३५ , सर्व राहणार शेंदुर्जन , गौतम पुंजाजी काकडे ४८ देऊळगाव कोळ , पवन भिवसन साळवे ३४ राहणार मलकापूर पांग्रा , ज्ञानेश्वर उत्तम नागरे ४५ भंडारी , प्रविण अंबादास उगलमुगले ३८ राहणार जागदरी , हे मिळून आले . तर गुलाबराव ककुदे शेंदुर्जन हे फरार झाले आहे . आरोपी विरुद्ध कलम १२ अ मजुका खाली गुन्हा दाखल केला आहे . ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस का . गणेश भगवान कड , डिगांबर चव्हाण , सुनील देशमुख , किशोर बोरे , किशोर सांगळे , बंद्री शिंदे , चालक सलीम गवळी या पोलिस कर्मचारी उपरोक्त कारवाई केली . पुढील तपास बीट जमादार रामदास वैराळ हे करीत आहेत .
