शेळगांव आटोळ जि.प.सर्कलसाठी सौ.आशाताई समाधान परिहार ह्या उच्चशिक्षित,प्रभावी व योग्य उमेदवार…

Oplus_16908288

Oplus_16908288

चिखली (बुलढाणा माझा न्युज ) चिखली तालुक्यातील शेळगांव आटोळ जि.प.चे आरक्षण ओबीसी महिला असल्याने तसेच निवडणुक जवळ असल्याने सर्वच राजकिय पक्षाचे इच्छुक उमेदवार तयारीला लागलेले आहेत या मतदार संघाचा एकुण इतिहास बघता या मतदार संघात चांगल्या व्यक्तिलाच लोकांनी निवडून दिलेले आहे.स्व.पांडुरंग पाटील खेडेकर,श्री.अशोकराव सुरडकर,श्री.एकनाथराव थुट्टे श्रीमती शिनगारेताई यांचा समावेश राहिलेला आहे.सर्वांना सोबत घेऊन चालणारा मतदारसंघ म्हणून या मतदार संघाची ओळख आहे.थोड्याच दिवसात न.प.निवडणुकीनंतर लगेच जि.प.पं.स.च्या निवडणुका होणार आहेत.

अनेक इच्छुक उमेदवारांसोबतच सौ.आशाताई समाधान परिहार यांचेही नांव संभाव्य उमेदवारांमधे अग्रक्रमाने घेतल्या जात आहे,सौ.आशाताई ह्या स्वतः सक्षम असून उच्चशिक्षित असल्याने स्वतः निर्णयक्षम आहेत त्यांच्या कार्याची दखल राज्यशासनाने घेतलेली असुन त्यांना अहिल्याबाई होळकर सक्षम महिला पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांचे पती श्री.समाधान परिहार सर हे शासकिय सेवेत असुन अत्यंत कर्तृत्ववान,अभ्यासू,कार्यकुशल व दांडगा जनसंपर्क असलेले मोठा मित्रपरिवाराचा गोतावळा असणारे,सर्वधर्मसमभाव विचारसरणी जोपासणारे,अंचरवाडी येथे परिसरात दर्जेदार व उच्चशिक्षण मिळावे म्हणून त्यांनी स्वप्नपूर्ती स्कूल&ज्यु.काॅलेज नावाने प्रशस्त शैक्षणिक संकुल उभे केले आहे सर्वांशी सलोख्याने वागणारे दिलदार स्वभावाचे इतरांना मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून लोकप्रिय आहेत.त्यांचे वडील श्री.एकनाथराव परिहार हे सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे,सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सौज्वळ स्वभावाचे व्यक्ति आहेत सरांचे बंधु श्री.रविंद्र परिहार सर यांचेही सर्वच स्थरातील लोकांशी सलोख्याचे संबंध आहेत.
गावात तसेच परिसरात कोणत्याही गटातटाच्या राजकारणात या परिवाराने कधीही कोणतीही अभिलाषा ठेऊन हस्तक्षेप केला नसल्याने सर्वांना चालणारे उमेदवार म्हणून प्राधान्य आहे.सर्व परिस्थिती उत्तम,सुदृढ असतांनाही कुठेही बडेजाव न मिरवता अत्यंत स्थिर असणारे कुटुंब जमिनीशी व समाजाशी घट्ट जोडलेले आहे..शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक,शेती,सहकार या सर्वच क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी राहिलेली आहे…गोरगरीब,दिनदुबळ्यांना मदत करणे हा स्थायीभाव यांच्याकडे आहे..जि.प.निवडणूक लढावी ही जनभावना असून जनतेचा आग्रह आहे.जि.प.मधे प्रतिनिधीत्व करण्याची संधी सौ.आशाताई समाधान परिहार यांना मिळाल्यास मतदार सांघाचा कायापालट होईल यात दुमत नाही.या मतदार संघातील अंचरवाडी-वसंतनगर हे स्वतःचे गांव असुन त्यांच्या स्वतःच्या गावात 3700 मतदार असुन ही त्यांची जमेची बाजु आहे शेळगांव आटोळ,इसरुळ,मंगरूळ,आमोना,मिसाळवाडी,पिंपळवाडी,कोणड,देऊळगांव घुबे,भरोसा,मेरा खु.,रामनगर,काळोनावाडी,बेराळा,येवता,मुरादपूर या समाविष्ट 16 ही गावात प्रत्येक घरोघरी त्यांचा वैयक्तिक संपर्क असुन हा त्यांचा गड समजल्या जातो.परंतु शेळगांव आटोळ जि.प.सर्कल मधे कोणत्या पक्षाकडुन निवडणूक लढणार याबाबतीत अजूनही संभ्रम कायम असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार मा.आ.सौ.श्वेताताई महाले,मा.आ.मनोज कायंदे,एकनाथराव थुट्टे(शेतकरी संघटना) या नेतृत्वासोबत उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे..सौ.आशाताई यांना उमेदवारी म्हणजे विजयाची हमी हे समिकरण पक्के आहे.कारण कोणतेही पक्षनेतृत्व हे जनमत असणार्‍या चांगल्या व विजयी होणार्‍या उमेदवारालाच प्राधान्य देत असतात त्यामुळे याबाबत लवकरच चांगला निर्णय होईल अशी आशा आहे…

You may have missed

error: Content is protected !!