भारत पारंपरिक औषधशास्त्रात सातत्याने प्रगती करीत आहे… केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव.WHO शिखर परीषद नियोजनाची बैठक केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे संपन्न
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज)”भारत संशोधन, जागतिक सहकार्य आणि दर्जा व सुरक्षितता यांची सशक्त चौकट निर्माण करून पारंपरिक औषधशास्त्राच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
10 नोव्हेंबर रोजी आयुष मंत्रालयाने आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांची संयुक्त बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 17 ते 19 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या दुसऱ्या WHO जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये राजदूत, उच्चायुक्त आणि राजनैतिक प्रतिनिधींना शिखर परिषदेचे उद्दिष्ट, जागतिक आरोग्याशी त्याचे महत्त्व आणि बहुपक्षीय सहकार्याच्या संधींबद्दल माहिती देण्यात आली. या बैठकीला आयुष मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव, तसेच आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) श्री. सिबी जॉर्ज. WHO आणि आयुष मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, ज्यात डॉ. पुनम खेतरपाल सिंग (माजी प्रादेशिक संचालक, WHO दक्षिण-पूर्व आशिया प्रदेश), डॉ. श्याम कुरुविल्ला (संचालक, WHO जागतिक पारंपरिक औषध केंद्र), श्रीमती मोनालिसा दास (संयुक्त सचिव, आयुष मंत्रालय), आणि डॉ. कॅथरिना बोहमे (वरिष्ठ सल्लागार, WHO महासंचालक) उपस्थित होते.
ही परिषद आरोग्यसेवा प्रणालींच्या सामायिक क्षेत्रातील योगदाना संदर्भांत एक महत्वाच पाऊल ठरणार आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रासोबत पारंपरिक ज्ञानाचे एकत्रीकरण जगभरात पुन्हा मान्यता मिळवत आहे. भारत या क्षेत्रात संशोधन, जागतिक सहकार्य आणि दर्जा व सुरक्षितता सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. WHO आणि जामनगर येथील पारंपरिक औषध केंद्राच्या सहकार्याने आम्ही संशोधनाला चालना देत आहोत आणि सर्वांसाठी पारंपरिक औषधांचे फायदे उपलब्ध करून देत आहोत. असेही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले. ही जागतिक परिषद सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज आणि शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये पारंपरिक औषधशास्त्राची महत्त्वपूर्ण भूमिका पुन्हा अधोरेखित करेल.” असा आशावाद आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी यावेळी व्यक्त केला.
“पारंपरिक औषधशास्त्र हे ‘Health for All’ या उद्दिष्टाचा अविभाज्य भाग आहे. 170 देशांनी पारंपरिक औषधांचा वापर नोंदवला आहे, आणि आता या क्षेत्राला अभूतपूर्व गती मिळाली आहे. असे डॉ. पुनम खेतरपाल सिंग यांनी यावेळी सांगितले.
WHO या क्षेत्रातील वैज्ञानिक आधार, सुरक्षितता, दर्जा आणि न्याय्य प्रवेश मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे.” असे आरोग्य सचिव (पश्चिम) श्री. सिबी जॉर्ज यांनी नमूद केले की. “ही परिषद पारंपरिक उपचारपद्धती आणि आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाच्या एकत्रीकरणासाठी एक महत्वपुर्ण टप्पा आहे. आरोग्य आणि समतोल पुनर्संचयित करण्याची ही एक सामायिक दृष्टी आहे.” डॉ. श्याम कुरुविल्ला, WHO जागतिक पारंपरिक औषध केंद्र, यांनी सांगितले की, “ही परिषद लोक आणि पृथ्वीच्या संतुलनासाठी जागतिक चळवळ पुढे नेईल. यावेळी श्रीमती मोनालिसा दास यांनी शिखर परिषदेच्या नियोजना संदर्भांतील सादरीकरण या बैठकीत केले.
