श्री. पुंडलिक महाराज महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उद्योग व्यवसाय रोजगार मार्गदर्शन !

IMG-20251112-WA0038

नांदुरा (बुलढाणा माझा न्युज ) श्री.शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा रेल्वे येथे बुधवार दिनांक 12 नोहेंबर रोजी ग्रामीण भागातील युवकांना रोजगार, नोकरी विषयक मार्गदर्शन करण्याकरिता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ अलका मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अतुल घुईखेडकर राष्ट्रीय अध्यक्ष रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया यांनी आजच्या जागतिकीकरणाच्या काळात ग्रामीण भागातील रोजगार विषयक समस्या, शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्याकरिता विद्यार्थी स्वावलंबी होणे गरजेचे आहे, भारत देश युवकांचा देश आहे युवकांनी आपल्या उद्दिष्टा पर्यंत पोहचण्याकरिता आपल्यातील कौशल्य ओळखून वेळेचे महत्व विचारात घेऊन उद्याच्या भविष्याची तरतूद करणे आवश्यक आहे. शिकत असताना उद्योग करायचा की नोकरी ? हे विचारत घेऊन त्या दिशेने कार्य करणे गरजेचे आहे. शहरीकरण कमी करून ग्रामीण भागातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला तर निश्चितच देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ होईल, दरडोई उत्पन्न वाढून विकासास हातभार लागेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. योगेश सरदार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अनंता लाहुडकर यांनी केले कार्यक्रमाला प्रा.खंडारे, प्रा.शिंदे, प्रा.वेरुळकर, डॉ.अमोल निपटे, प्रा.इंगळे, प्रा. ढोरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!