निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक क्षेत्रीय अधिकारी तसेच SST,VST,FST पथकाच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यशस्वी पडले पार !!

Screenshot_2025-11-14-13-59-27-42_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )मा. राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद निवडणूक 2025 चा कार्यक्रम दि. 4 नोव्हेंबर 2025 ला जाहिर केला आहे, त्याअनुषंगाने आज दि. 13 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपरिषद कार्यालय बुलढाणा येथे SST, VST, FST पथकातील सर्व कर्मचारी यांची उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
SST पथकातील सर्व कर्मचाऱ्यांनी वाहनाची तपासणी ही योग्यरीत्या करावी, तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सर्व वाहनांची नंबर लिहून घ्यावेत तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी बॅरिकेट लावून वाहनांची तपासणी योग्यरीत्या कशी पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अश्या प्रकारच्या सूचना शरद पाटील यांनी दिल्या.
FST पथकाने प्राप्त झालेल्या तक्रारींची तक्रार स्थळी जाऊन चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करण्याची सूचना सुद्धा दिल्या आहेत. SST पथक हे दिनांक 13 नोव्हेंबर पासून कार्यान्वित होणार आहे तरी या पथकातील सर्व अधिकाऱ्यांनी / कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी अशा सूचना त्यांना देण्यात आल्या.
सर्व झोनल अधिकाऱ्यांनी सर्व मतदान केंद्राची पाहणी करून घ्यावी, पाहणीवेळी काही मतदान केंद्र जर संवेदनशील आढळली तर तसा अहवाल तयार करून तो सादर करायच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी संवेदनशील भागातील मतदान केंद्राना सुरक्षा पुरवण्यासाठी ची योग्य ती कार्यवाही करावी. निवडणुकी संदर्भात काही मार्गदर्शक सूचना सर्व कर्मचाऱ्यांना सांगितल्या, तसेच नगर परिषद निवडणुकीला प्राधान्य देऊन सर्व प्रक्रिया यशस्वी रित्या पार पाडण्याचे आवाहन केले…सभेला बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे , मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री काटकर तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!