अंढेरा हद्दीत अवैध वाळू वाहतुकीवर एलसीबीची सलग दोन कारवाया; दोन टिप्परांसह ६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
सिंदखेडराजा (अनिल दराडे )अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सलग दोन दिवस दोन मोठ्या कारवाया करून दोन टिप्परांसह अंदाजे ₹६६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री. अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री. श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री. सुनिल अंबुलकर यांच्या आदेशाने एलसीबी पथकाने दोन्ही कारवाया केल्या.
१२ नोव्हेंबरची कारवाई
कोनड खु. शिवारात नाकाबंदी दरम्यान अशोक लेलँड पांढऱ्या रंगाचा टिप्पर अडवण्यात आला. वाहनातून ६ ब्रास अवैध वाळू (किंमत ₹६०,000) मिळून आली. वाहनाची किंमत ₹३० लाख असून एकूण ₹३०,६०,००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाई पथक: PSI प्रताप बाजड, HC शरद गिरी, HC पुरषोत्तम आघाव, PC निलेश राजपूत, DHC विकास देशमुख.
१३ नोव्हेंबरची कारवाई
दिग्रस शिवारात रात्री नाकाबंदी दरम्यान नंबर प्लेटविना पांढरा टिप्पर पकडण्यात आला. वाहनातून ४ ब्रास वाळू (किंमत ₹४०,000) मिळाली. टिप्पर किंमत ₹३५ लाख असून एकूण ₹३५,४०,००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाई पथक: PSI अविनाश जायभाये, HC जगदेव टेकाळे, HC दिगंबर कपाटे, PN अनता फरतळे, PC दिपक वायाळ.
दोन्ही टिप्पर अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले असून आरोपींवर BNS कलम 303(2) सह कलम 21(1)(2) गौण खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या सलग कारवायांमुळे वाळू माफियांना चाप बसला असला तरी स्थानिक नागरिकांचा प्रश्न कायम आहे—
अंढेरा हद्दीत रोज टिप्परने वाळू वाहतूक सुरू असताना स्थानिक पोलीस कारवाईत मागे का पडत आहेत?
