सिंदखेडराजा नगर परिषद निवडणूकिसाठी प्रशासन सज्ज, मतदान सुरक्षा कक्ष तसेच मतमोजणी केंद्राची निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्याकडून पाहणी

IMG-20251114-WA0055

सिंदखेडराजा (अनिल दराडे)महाराष्ट्र नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 निवडणूक कार्यक्रमाची तय्यारी जोरदार सुरु असून त्याअनुषंगाने आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी
मा. निवडणुक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी नगर परिषद निवडणूक विभागाला भेट देऊन पाहणी केली.प्रा.संजय खडसे आणि Dysp मनीषा कदम यांनी मतदान सुरक्षा कक्षाला भेट देऊन सुरक्षा कक्षाची पाहणी केली. मतदान सुरक्षा कक्षामध्ये लाईट तसेच आवश्यक लागणाऱ्या सर्व सुविधांची खातरजमा करून घेतली तसेच मतदान सुरक्षा कक्षामध्ये EVM मशीन ठेवल्यापासून ते प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कशाप्रकारे मतदान सुरक्षा कक्षाची व्यवस्था हाताळली पाहिजे याबद्दल निवडणूक अधिकारी तसेच कर्मचारी यांना प्रा. खडसे यांनी मार्गदर्शन केले.आज च्या पाहणीमध्ये मतमोजणी केंद्राला सुद्धा भेट देऊन त्या कक्षाची पाहणी करण्यात आली.
मतमोजणी केंद्र हे निवडणूक प्रक्रियेमधील खूप संवेदनशील कक्ष असतो, त्या कक्षा मध्ये टेबलं व्यवस्था कशी असली पाहिजे, EVM मशीन कश्या पद्धतीने हाताळायला पाहिजे, बैठक व्यवस्था कशी असली पाहिजे, बाकी सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाला सूचना प्रा. खडसे यांनी दिल्या.

मतदान सुरक्षा कक्ष, मतमोजणी केंद्र अश्या महत्वाच्या संवेदनशील कक्षामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका ही निर्णायक असते. या दोन्ही कक्षासाठी सुरक्षा पुरवण्याचे काम पोलीस विभागाने चोख पार पाडावे अश्या प्रकारच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) मनीषा कदम यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.

उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना त्यांना मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नेमून दिलेली जबाबदारी योग्य रित्या पार पाडावी तसेच काही समस्या येत असतील तर संबंधित अधिकाऱ्यांना कळवाव्यात अश्या प्रकारच्या सूचना प्रा. खडसे यांनी दिल्या.

आजच्या या पाहणी दौऱ्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, तहसीलदार अजित दिवटे, मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, नायब तहसीलदार नितीन बढे, पोलीस निरीक्षक आशिष इंगळे,शहर अभियंता काझी इत्यादी उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!