सिंदखेड राजा येथील तत्कालीन नायब तहसीलदार श्री लटके यांचे पदोन्नतीने तहसीलदार म्हणून पदोन्नती.
सिदखेडराजा (अनिल दराडे) सध्या मा. महसूल मंत्री महोदय यांचे स्वीय सहायक म्हणून मुंबई येथे कार्यरत.सिंदखेड राजा तहसीलचा अभिमान. नुकतेच मागील आठवड्यात सिंदखेड राजा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले पाच तत्कालीन तहसीलदार यांना पदोन्नतीने उपजिल्हाधिकारी म्हणून पदस्थापना मिळाली. त्यामध्ये आणखीन आनंदाची भर पडली. सिंदखेड राजा येथे 5 वर्षे सेवा दिलेले तत्कालीन नायब तहसीलदार श्री. प्रवीण लटके यांची काल पदोन्नतीने तहसीलदार पदी नियुक्ती झाली.
सिंदखेड राजा तहसील येथे कार्यरत असताना त्यांनी सरकारी सेवेत प्रामाणिकपणे, जनहित दृष्टिकोनातून आणि पारदर्शक प्रशासनाचा उत्तम आदर्श ठेवत त्यांनी कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला. तहसील कार्यालयात कार्यरत असताना त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक नागरिकांची समस्या सोडवण्याचे त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी सर्व सामान्य जनतेशी थेट संवाद साधत लोकहिताच्या कामांना नेहमी प्राधान्य दिले. त्यांच्याकडे आलेले शेतीच्या रस्त्या विषयी प्रश्न त्यांनी अतिशय कार्यतत्परतेने निकाली काढण्याचे प्रयत्न केले. कोरोना काळामध्ये सिदखेड राजा तालुक्यामध्ये त्यांनी सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केले. सध्या ते महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री यांचे स्विय सहाय्यक म्हणून मुंबई येथे प्रमाणिकपणे कर्तव्य पार पाडत आहे. त्यांच्या या पदोन्नती बद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
