स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३६ व्या जयंती साजरी
सिंदखेडराजा (अनिल दराडे) दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रामध्ये १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘राष्ट्रीय बालदिवस’ हा दिवस आनंदायी वातावरण साजरा करण्यात आला.मुलांमध्ये ‘चाचा नेहरू’ म्हणून ओळखले जाणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस ‘मुलांच्या शिक्षण आणि कल्याणासाठी’ पंडित नेहरूंच्या दृष्टिकोनाचे स्मरण करतो.या दिवसाचे उद्दिष्ट मुलांचे हक्क, आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे आहे.यावर्षीची संकल्पना ‘For every child,every right'( प्रत्येक मुलासाठी,प्रत्येक हक्कासाठी) होती यासंबंधी सविस्तर अशी माहिती साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये अंगणवाडी सेविका प्रिया तेजकोर प्रकाश खरात यांनी विशद केली.याप्रसंगी तांदुळवाडी येथील ग्रामस्थ माजी PSI श्री. प्रकाश खरात,श्री.राजरत्न खरात,अंगणवाडी मदतनीस सौ.साधना राजरत्न खरात आणि अंगणवाडी विद्यार्थी उपस्थित होते.याप्रसंगी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला.
