झोटिंगा येथे माजी सैनिक सेवाभूती सोहळा संपन्न. देश सेवेसाठी 19 वर्षे महाराष्ट्र पोलीस दलात 16 वर्षे सेवा दिली.

IMG-20250630-WA0016

सिंदखेडराजा (अनिल दराडे) सिंदखेडराजा तालुक्यातील झोटिंगा येथील माजी सैनिक व सध्या बीबी पोलीस स्टेशन येथे अधिकारी म्हणून कार्यरत असणारे श्री भगवान लक्ष्मण नागरे आज 30 जून 2025 रोजी पोलीस दलातून सेवानिवृत्त होत आहे. त्या निमित्ताने झोटिंगा येथे त्यांचा सत्कार व सेवापुर्ती सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.श्री भगवान नांगरे यांनी भारतीय सैन्य दलामध्ये 19 वर्षे सेवा दिली. भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांना आपली सेवा ही कार्यरत राहावी म्हणून त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रजू झाले. त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जवळपास 16 वर्षे सेवा दिली. दोन्ही सेवांचा एकत्रित कालावधी केला तर त्यांनी देश सेवेसाठी जवळपास 35 वर्षे सेवा दिली. देश सेवेमध्ये कार्यरत असताना त्यांनी आपल्या गावामध्ये नवीन मुलांना देश सेवा करण्याची प्रेरणा दिली. विशेष म्हणजे भगवान नागरे यांचे दोन्ही मुले सुद्धा ही भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत आहे. त्यांच्या या आजच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त झोटिंगा गावामध्ये त्यांची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली.यामध्ये गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. यामध्ये झोटिंगा गावचे सरपंच श्री अशोक वाघ, माजी सरपंच श्री विजय दिघोळे, श्री सुभाष केदार, सोपान केदार, गणेश वाघ, भगवान नागरे, शाहीर थोरवे, शिवहरी डिगोळे, दिलीप वाघ, मोहन डिगोळे आदी मंडळी उपस्थित होती.

You may have missed

error: Content is protected !!