सोनोशी जिल्हा परिषद सर्कल मध्ये आमदार मनोज कायंदेनी केला खेड्यापाड्यात दौरा….

IMG-20250701-WA0020

सोनोशी जिल्हा परिषद मधून नितीन शेळके पाटील यांची तयारी सर्कलमध्ये जोरदार चर्च

सिंदखेडराजा (अनिल दराडे )सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी जिल्हा परिषद सर्कलमध्ये आमदार मनोज कायंदे यांनी कार्यत्यांच्या भेटी व समस्या घेतल्या जाणून व सात्वनपर भेटी दिल्या धांदरवाडी, भोसा, माघील महिन्यात शेलू येथील सखाराम एखंडे व हरिचंद्र एखंडे यांचे दुखत निधन झाले होते त्यांच्या कुटुंबायांना आमदार मनोज कायंदे नी भेटी दिल्या चिंचोली, वर्दडी अनेक गावामध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या या भागात कायंदे यांचा मोठा चाहता वर्ग आहे ते आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा सर्कल मध्ये त्यांनी दौरा केला असून त्यांनी कार्यक्त्यांना सांगितले की तुमचे कोणतेही काम असू द्या माझ्याशी संपर्क साधा यावेळी जनतेची काळजी घेणारा आमदार मनोज कायंदे हा तुमच्या पाठीशी ठाम पणे उभा आहे नव्याने प्रवेश झालेल्या राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) नेते तथा सरपंच नितीन शेळके पाटील यांचा पुण्यात एका कार्यक्रमात आ मनोज कायंदे व जिल्हाध्यक्ष ऍ नाझेर काजी साहेब यांच्या नेतृत्वा वर विश्वास ठेवून अजित पवार गटात प्रवेश घेतला असून आता ते मनोज कायंदे यांच्या खांध्याला खांदा लावून मतदारसंघात काम करण्याचे असले सांगितले शेळके यांनी म्हंटले की गाव तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता तयार काम खेड्यापाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा व शाखा तयार करू आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही या पुढे दौरे करून आढावा घेणार आहोत त्यातच सर्कलमध्ये दौरा केल्यानांतर जनतेकडून सोनोशी जिल्हा परिषद सर्कलमधून नितीन शेळके पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे शेळके म्हणाले की पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजित दादा पवार साहेब व आमदार मनोज कायंदे जिल्हाध्यक्ष काझी साहेब यांनी संधी दिल्या जीवाचं रान करून सोनोशी जिल्हा परिषद सर्कल वर राष्ट्रवादी चा झेंडा फडकवून दाखवू हजारोच्या मताने विजयी होऊ आमदार मनोज कायंदे सोबत, युवा नेते नितीन शेळके पाटील, विजय कुहिरे पाटील, वशीम शेख,युवा नेता रामेश्वर एखंडे पाटील यांच्या सह अनेक कार्यकर्ते दौरा सोबत होते

You may have missed

error: Content is protected !!