एक शाम स्वर्गीय गायको के नाम “सुरसंगम कार्यक्रमातचिखली व स्थानिक गायकांनी अमडापूर श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध…

IMG-20251115-WA0131

उदयनगर (दिलीप हातागळे)अमडापूर येथे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी काराओके गितांच्या सुरसंगम संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर या कार्यक्रमाला परिसरातील कराओके गायकांची उपस्थितीती लाभली होती, अनेक फिल्मी गाण्यावर ह्या गायकांनी गाणे गाऊन त्यांच्या मधुर आवाजाने अमडापूर सह परिसरातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. हा कार्यक्रम वार्ड नंबर पाच असलेल्या पटांगणामध्ये अतिशय संगीतमय वातावरणामध्ये पार पडला परिसरातील चहत्यांनी या कार्यक्रमाला भरभरून उत्तम प्रतिसाद दिला . या कार्यक्रमाचे आयोजन अमडापूर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य धोंडू भाऊ देवकर , अब्दुल सोहिल, यांनी केले होते.कार्यक्रमांमध्ये कराओके गायक फिरोज खान, सुनंदा देवकर, अजीब खान, सीमा मिसाळकर, सतीश वानखेडे, अविनाश सर, या गायकांनी विविध स्वर्गीय गायकांनी गायलेले गाणे गाऊन श्रोत्यांना घायाळ केले, श्रोत्यांनी सर्व गायकांच्या गाण्यावर फिदा होऊन बक्षीस स्वरूपात पैशांचा पाऊस पडला. या बहारदार गीतांच्या कार्यक्रमाला अमडापुरातील राजकीय दिग्गज नेते सुध्दा रोखू शकले नसल्याने या ठिकाणी त्यांनी बसून कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी या ठिकाणी अमडापूर ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. वैशाली ताई संजय गवई, माजी सरपंच श्रीमती ललिता ताई माळोदे, माजी सरपंच कमर अफजल खान, माजी जिल्हा परिषद सदस्य श्याम भाऊ पठाडे, माजी सरपंच शाहेद पटेल,ग्रामपंचायत सदस्य संजय गवई, शिवसेना नेते हैदर सेट कुरेशी, शेख एजाज, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद रत्नपारखी, गाजी खान, विनोद सरसे ,अण्णा देवकर, राज देशमुख, प्रकाश खराडे, बाबुराव सोनने, अलियार खान, श्याम जुमडे, किशोर डहाळे, शरद देवकर, या सर्व चाहत्यांनी विशेष उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायक फिरोज खान यांनी केले

You may have missed

error: Content is protected !!