सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणूक : उमेदवारी अर्ज दाखल करण्यास वेग, आजपर्यंत एकूण ६१ अर्ज दाखल
सिंदखेडराजा (अनिल दराडे)सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज मोठी गर्दी पाहायला मिळाली. नगरसेवक पदासाठी आज एकाच दिवशी तब्बल ५७ अर्ज दाखल झाले असून, याआधीच्या सहा दिवसांत आलेले ४ अर्ज धरता नगरसेवक पदासाठी एकूण ६१ अर्ज प्राप्त झाले आहेत.

राजकीय पक्षनिहाय आकडेवारी अशी :
शिवसेना (शिंदे गट) – 19
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 2
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 10
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 15
अपक्ष – 12
भाजप – 3
एकूण अर्ज – 61
दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठीही आज 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात
वंचित बहुजन आघाडी – 1
शिवसेना (शिंदे गट) – 1
अपक्ष – 1
एकूण अर्ज – 3
याचबरोबर शिवसेना पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी अतिश बाळाजी तायडे यांनी, तसेच प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवक पदासाठी सौ. संगीता किशोर म्हस्के व राजेश एकनाथ आढाव यांनी आपले उमेदवारी अर्ज धनुष्यबाण चिन्हावर दाखल केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
