लेखणीच्या जोरावर इसरूळ ग्रामसेवा सहकारी सोसायटी च्या अध्यक्षपदी पत्रकार भिकनराव प्रभतराव भुतेकर यांची बिनविरोध निवड झाली.
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे इसरुळ येथील ग्रामसेवा सहकारी सोसायटी
अध्यक्षपदासाठी भिकनराव भुतेकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता.या अर्जावेळी सूचक म्हणून संतोष नारायण गाडेकर तर अनुमोदक म्हणून बालू किसनराव वायाळ यांनी स्वाक्षरी केल्या. हजर असलेल्या 11 संचालकांनी यांना सहमती दर्शविली.
यावेळी दोन संचालक गैरहजर होते.पूर्वीच्या अध्यक्षांनी त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव ५/७/२०२५ रोजी राजीनामा दिला होता. संचालक मंडळाच्या २१/७/२०२५ रोजी झालेल्या मासिक सभेत तो राजीनामा मंजूर करण्यात आला. त्याच अनुषंगाने अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शुक्रवार १४ नोव्हेंबर २०२५ रोजी निवड प्रक्रिया पार पडली.
निवडणूक अधिकारी सतीश जाधव म्हणून काम पाहिले, यावेळी ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे सचिव पडघान साहेब, इसरूळ चे सरपंच सतीश पाटील, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, कृ. उ. बाजार समितीचे माजी उपसभापती, ओमप्रकाश भुतेकर, संचालक, रामभाऊ जाधव, बाळासाहेब पवार, मनोज भुतेकर, जाकीर शेख, ग्रामसेवा सोसायटीचे उपाध्यक्ष गजानन काळे तसेच संचालक आदी उपस्थितांनी या निवडीचे स्वागत केले तसेच चिखली तालुका डिजिटल मीडियाच्या वतीने सुद्धा त्यांचे स्वागत करण्यात आले आहे त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधी यांनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी माझ्या अधिकाराचा वापर हा योग्य तेच काम करण्यासाठी करेल असे दूरध्वनीवरून माहिती दिली आहे
