अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट !अंत्री खेडेकर येथील शेतकऱ्यांच्या 16 स्पिंकलर तोट्या लंपास.

hqdefault (2)

चिखली (बुलढाणा माझा न्युज )चिखली तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अंत्री खेडेकर येथील शेतकरी एकनाथ माळेकर यांच्या अंत्री शिवारातील गट नंबर 57 मध्ये दोन हेक्टर जमीन असून सदर शेतीमध्ये यावर्षी मक्याचे पिक घेतले आहे. दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्याने मकाच्या शेतामध्ये स्पिंकलर लावून ठेवले होते.सायंकाळी साडेसहा वाजता घरी गेले. दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:00 वाजेच्या सुमारास शेतामध्ये गेले असतांना पाणी उडताना दिसले. यावरून शेतकऱ्याने विहिरीवर जाऊन मोटर पंप बंद करून शेतामध्ये गेले असता, लावलेल्या कावेरी, जिंदाल व जैन कंपनीच्या 16 तोट्या त्यांना दिसून आल्या नाही. यावरून त्यांच्या शेतातील कावेरी ,जिंदाल व जैन कंपनीच्या 16 तोट्या प्रत्येकी नग 850 रुपये प्रमाणे किंमत 13600 रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची त्या शेतकऱ्यांनी तक्रार अंढेरा पोलीस स्टेशनला दिली आहे.या शेतात सुरू असलेल्या तुषार संचाने पाणी देण्याच्या स्प्रिंकलरच्या तोट्या चोरट्यांनी रातोरात लंपास केल्याने अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. रात्रीतून जवळपास 16 तोट्या चोरट्याने लंपास केल्या आहेत .त्यामुळे आधीच विजेच्या लपंडावाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. स्पिंकलरच्या तोट्या चोरणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांनी ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी ऐरणीवर आली आहे. अंढेरा पोलीस स्टेशन पासून अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मेरा खुर्द, मेरा बुद्रुक,गुंजाळा ,मनुबाई या गावांमध्ये सध्या शेती पेरणीचे काम सुरू आहे व शेतीला पाणी देण्याचे काम सुद्धा सुरू आहे. या तोट्या चोरीमुळे एकच खळबळ अंत्री खेडेकर, मेरा बुद्रुक सह परिसरात तील गावामध्ये उडाली आहे. आधीच शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाशी लढत असतानाच चोरट्यांनी चोरीचा धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यावर खूप मोठे संकट कोसळले आहे. अंत्री खेडेकर येथील एकनाथ माळेकर यांच्या शेतातील काल रात्री चोरट्यांनी 16 स्पिंकलरच्या तोट्या लंपास केले आहेत ही गोष्ट आज सकाळी शेतकरी एकनाथ माळेकर आपल्या शेतामध्ये सकाळी गेले असता त्यांच्या लक्षात आली या चोरट्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. चोरट्यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला सुद्धा मोठ्या आव्हान दिले आहे. आता अंढेरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार रुपेश शक्करगे हे चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्यात यशस्वी होतात की नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी वीजपुरवठा नाही त्यामुळे शेतकरी हा तुषार सिंचनाच्या भरोशावर शेती करत आहे .परंतु चोरट्यांनी तुषार सिंचनाचे जवळजवळ सोळा तोट्या या भागातील चोरून नेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठे संकट उभे राहीले आहे .तरी स्थानिक पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या चोरीचा छडा लावून परिसरातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी या परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

You may have missed

error: Content is protected !!