शालेय राज्यस्तरीय तलवारबाजीत अथर्व नितीन जेऊघाले ला कास्यपदक

IMG-20251121-WA0001

बुलडाणा:- ( निलेश कोल्हे) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी नगर जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तथा महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशन यांच्या सहकार्याने शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा दिनांक १२ ते १४ नोव्हेंबर २५ दरम्यान विभागीय क्रीडा संकुल संभाजीनगर येथे नुकत्याच संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बुलढाण्याचा खेळाडू अथर्व नितीन जेऊघाले १४ वर्षे वयोगटातील अमरावती विभागाचे नेतृत्व करत नाशिक विभागावर मात करून फॉईल या सांघिक खेळात कांस्यपदक पटकावल्याबद्दल प्राचार्य अजय इंगळे सर, क्रीडा शिक्षक, शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांनी खेळाडू अथर्व जेऊघाले याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.
शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागाचे वर्चस्व कायम ठेवल्याबद्दल व कास्यपदक पटकवल्या बद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर अनुराधा सोळंकी स. क्रीडा अधिकारी बुलढाणा जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी राजे जाधव, सचिव शेषनारायण लोढे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेलो इंडिया चे प्रशिक्षक अक्षय गोलांडे श्रीराम निळे, दर्शन बोर्डे, शुभम सुरडकर, वैभव लोंढे, दिलीप लाडकर सर यांनी अभिनंदन केले आहे खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय शेषनारायण लोढे अक्षय गोलांडे दर्शन बोर्डे व आई-वडील यांना दिले आहे.

You may have missed

error: Content is protected !!