कापसाचे पैसे मागितल्याचा ‘दंड’!.दलित शेतकऱ्यावर मारहाण-जातीवादाचा कहर; चार जणांवर अ.जा./ज.अ.प्र. कायद्यानुसार गुन्हा दाखल

IMG-20251121-WA0084

सिंदखेडराजा(अनिल दराडे)तालुक्यातील जऊळका (ता. सिंदखेडराजा) येथील दलित शेतकऱ्याने स्वतःच्या कष्टाच्या कापसाचे थकित पैसे मागितल्यावरून त्याच्यावर व्यापाऱ्यांनीच हल्ला चढवला. मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि जीव घेण्याच्या धमकीने हादरवून टाकणारा हा प्रकार प्रकाशात आला असून या प्रकरणी चार आरोपींवर किनगाव राजा पोलीसांनी कठोर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
जऊळका येथील शेतकऱ्यांनी लिंगा येथील कापसाचे व्यापारी जायभाये यांच्याकडे कापसाचे ₹1,37,709 मागताच संतापाचा स्फोट झाला आहे फिर्यादी प्रल्हाद नामदेव साळवे (वय 59, जात मातंग, रा. जऊळका) यांनी विक्री केलेल्या 19 क्विंटल 26 किलो कापसाचे ₹1,37,709 रुपये मागितले. एवढेच कारण बनले आणि त्यातून वादाचे रूपांतर थेट हल्ल्यात झाले, असे फिर्यादीच्या तक्रारीत स्पष्ट नमूद आहे.
दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वा. साळवे दांपत्य आणि पुतण्या शिवाजी साळवे हे पैसे मागण्यासाठी आरोपींच्या घरी गेले असता—
आरोपी प्रल्हाद जायभाये यांनी “पैसे कोर्टातूनच घ्या!” असे म्हणत फिर्यादीची कॉलर पकडून लोटपोट केली.
पवन जायभाये यांनी फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले.
पुष्पा आणि ऋतुजा जायभाये यांनी फिर्यादीच्या पत्नीला केसाला धरून मारहाण केली व
“पुन्हा आलात तर जिवाने मारू” अशी धमकी दिली.
फिर्यादीच्या मते आरोपींनी कापूस घेऊन पैसे न देता आर्थिक फसवणूक केली आहे.सदर प्रकरणी किनगाव राजा पोलीसांकडून तातडीची कारवाई करून चार आरोपींवर
किनगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी अप.क्र. 291/2023 नुसार खालील आरोपींवर अ.जा./ज.अ.प्र. कायदा व भादंवि संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  1. प्रल्हाद आश्रुबा जायभाये,
  2. पवन प्रल्हाद जायभाये,
  3. पुष्पा प्रल्हाद जायभाये,
  4. ऋतुजा पवन जायभाये,या आरोपीवर किनगाव राजा पोलीसांनी 19 नोव्हेंबर 2025 — संध्याकाळी 6.24 वा. गुन्हा दाखल अधिकारी: म.पो.हे.का. सोनल चव्हाण (बनं. 1763) तपास अधिकारी: उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम, देऊळगाव राजा पोलीस तपासाची चक्रे गतिमान झाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
    दलित शेतकऱ्याला केवळ त्याचे हक्काचे पैसे मागितल्याचा ‘अपराध’ — आणि त्यावरून मारहाण, धमक्या, अपमान! तालुक्यात या घटनेबद्दल संताप व्यक्त होत आहे.

You may have missed

error: Content is protected !!