तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रात CBE ‘सार्वजनिक आरोग्य’ पंधरवडा उत्साहात पार

Screenshot_2025-11-21-16-52-23-01_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेडराजा (अनिल दराडे)आज दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रात नोव्हेंबर महिन्यातील CBE (Community Based Event – समुदाय आधारित कार्यक्रम) अंतर्गत ‘सार्वजनिक आरोग्य’ हा दुसरा पंधरवड्याचा कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रूम्हणा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री. सातपुते सर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात आली.

कार्यक्रमाला पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी व रूम्हणा गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ श्री. प्रकाश जायभाये यांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहकार्य केले.

अध्यक्ष श्री. सातपुते सर यांनी उपस्थित विद्यार्थीवर्ग, पालकवर्ग व ग्रामस्थांना आरोग्याविषयक माहिती, स्वच्छतेचे महत्त्व तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ या शासकीय उपक्रमांतर्गत मुलींच्या शिक्षणाबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका प्रिया तेजकोर प्रकाश खरात यांनी केले, तर आभारप्रदर्शन मदतनीस सौ. साधना राजरत्न खरात यांनी केले.

शेवटी, उपस्थितांच्या सहभागामुळे कार्यक्रमाची सांगता समाधानाच्या वातावरणात झाली.

You may have missed

error: Content is protected !!