नगरपरिषद सिंदखेड राजा निवडणुकीचे प्रशिक्षण यशस्वीरत्या पडले पार

IMG-20251122-WA0023


सिंदखेडराजा( अनिल दराडे )नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा येथे आज दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, झोनल अधिकारी, सहाय्यक झोनल अधिकारी यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले.नगरपरिषद निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून मतदान अधिकाऱ्यांचे तसेच सर्व केंद्राध्यक्षांचे प्रशिक्षणाचा टप्पा आज पार पडला, EVM मशीन कशा पद्धतीने हाताळायच्या याबद्दल सविस्तर मार्गदर्शन श्री. उद्धव मांटे आणि श्री शिवानंद वाकदकर यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना केले.

मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सर्व उपस्थित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना काही मार्गदर्शक सूचना केल्या.

आज EVM मशीनद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.

  • निवडणूक प्रक्रिया सुरुळीत पार पाडण्याकरिता प्रत्यक्ष EVM मशीनद्वारे डेमो घेऊन समजावून सांगितले.
  • कोणत्याही उमेदवाराला किंवा सदस्याला किंवा नगराध्यक्षाला मतदान केल्याशिवाय बिप वाजणार नाही.
  • कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
  • कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट कसे हाताळावे याबाबत सविस्तर माहिती व सूचना देण्यात आल्या.
  • मतदान प्रक्रियेपूर्वी प्रतिनिधी यांच्या समक्ष मॉकपोल द्यावा.
  • आयोगाच्या सूचनेनुसार मतदान प्रक्रिया पार पाडावी.
  • पहिल्या मतदाराचे मतदान झाले की नाही यांची केंद्राध्यक्षानी खात्री करावी.
  • मशीन सिलिंग करताना जे टॅग दिलेले आहे त्यांचे काटेकोरपने वापर करुन त्यांचा वापर करावा.
  • मशीन सिलिंग करताना पोलिंग एजेंट ची स्वाक्षरी घ्यावी.
  • मशीन सील झाल्यानंतर केंद्राध्यक्षाची सही घ्यावी व पोलिंग एजेंट ची स्वाक्षरी घ्यावी.

आजच्या या प्रश्नासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवून हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडले, निवडणुकीच्या पुढील टप्प्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

आजच्या या प्रशिक्षण शिबिरासाठी मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.आशिष बोबडे, प्रसार माध्यम नोडल अधिकारी प्रकाश शिंदे,सहायक नोडल अधिकारी सचिन मिसाळ, ग्राम महसूल अधिकारी सुशील शिलवंत, ग्राम महसूल अधिकारी राहुल देशमुख, संगणक अभियंता सुजित चव्हाण,अभियंता निलेश शिंगणे तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!