बहुचर्चीत अंत्रीखेडेकर व आसोला बु येथील अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा, नायबतहसिलदार व क्रांतिकारी संघटना व शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर आसोला बु व अंत्रीखेडेकर येथील शेतकऱ्यांच आंदोलनाला यश…..
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे अंत्री खेडेकर व असोला बु येथे शासनाचे शेती नुकसानीचे अनुदान अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे महसूल विभाग चिखली यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करून व पाठपुरावा करून सुद्धा अंत्री खेडेकर व आसोला बु येथील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान येत नव्हते त्यामुळे क्रांतिकारी संघटनेचे विनायक सरनाईक व राम अंभोरे तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर व त्यांचे सहकारी तसेच अंत्री खेडेकर येथील विठ्ठल खेडेकर व त्यांचे सहकारी शेतकरी व असोला बु येथील श्रीकृष्ण कापसे सुधाकर सुर्वे व व त्यांचे सहकारी शेतकरी आज नाईफ तहसीलदार विर यांच्या केबिन मध्ये जवळजवळ तीन ते चार तास बैठे आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्यावर नाईफ तहसीलदार यांनी अंत्री खेडेकर व आसोला बु येथील महसूल अधिकारी विजय खरात यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून ऑफिसमध्ये बोलून अंत्रीखेडेकर व आसोला बु येथील शेतकरी यांच्याशी झालेल्या प्रकाराबाबत चौकशी केली असता त्यांनी लेखी आश्वासन दिले की मी दोन दिवसांमध्ये अंत्रीखेडेकर व असोला बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या अनुदानाचे रक्कम शेतकरी यांच्या खात्यावर टाकण्याचे काम पूर्ण करेल तसेच ज्या शेतकऱ्यांचे कांद्याचे अनुदान सुद्धा आले नाही त्या शेतकऱ्याचे सुद्धा अनुदानाची रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकेल असे लेखी आश्वासन अंत्री खेडेकर आसोला स
बु येथील शेतकऱ्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांनी क्रांतिकारी संघटनेचे विनायक सरनाईक व राम अंभोरे तसेच संतोष भुतेकर व अंत्री खेडेकर व असोला बुद्रुक येथील शेतकरी यांनी आपल्या आंदोलनाचा मार्ग मागे घेतला आणि दोन दिवसात जर आम्हाला अनुदान मिळाले नाही तर आम्ही कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू असे नाईफ तहसीलदार वीर यांना सांगितले आहे अंत्रीखेडेकर व आसोला बु येथील भरपूर शेतकरी या वेळी हजर होते
