निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा हद्दीत वाहनांची तपासणी…..
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )बुलढाणा येथील नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनियमितता रोखण्यासाठी आणि आदर्श आंचरसहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पालिका हद्दीत स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली.या पथकाकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.आचारसंहिता लागू झाल्यापासून संवेदनशील भागांमध्ये सतत गस्त, वाहनांची तपासणी, संशयितांवर बारीक नजर आणि सर्व राजकीय घडामोडींवर थेट नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी विविध पथकांवर सोपविण्यात आली आहे. या पथकांच्या सततच्या टेहळणीमुळे कोणत्याही अनधिकृत हालचालीसाठी जागा राहिलेली नाही. संभाजीनगर,अजिंठा धाड नाका रोडवर स्थिर सर्वेक्षण पथक प्रभावीरीत्या कार्यरत आहे. या पथकात पो. कॉ. सीमा पवार, श्रीकृष्ण जाधव (पथक प्रमुख) किरण ताम्हणे,फोटोग्राफर प्रमोद कोरडे या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व वाहनांवर आणि हालचालींवर विशेष लक्ष ठेवत आहे. संभाजीनगर,अजिंठा मार्गावरून बुलढाणा शहरात प्रवेश करणाऱ्यांची तपासणी, संवेदनशील ठिकाणी निगराणी, संशयास्पद हालचालींचे फोटोव्हिडिओ पुरावे गोळा करणे अशी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. संभाजीनगर,अजिंठा येणारा रस्ता गणाची सतत गस्त करण्यात येत आहे. या पथकाकडून आलेल्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
