बुलढाणा तालुक्यातील गोंदनखेड शिवारात अवैधरित्या गांजाअंमली पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्तीस पकडले, स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा पथकाची कामगिरी…..

Screenshot_2025-11-24-08-18-02-45_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )बुलढाणा तालुक्यातील बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोंधनखेड शिवारात रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकीस्वाराकडून २ किलो ५० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुलढाणा उपविभागात पेट्रोलिंग करत असताना गोंधनखेड शिवारात गणेश मेरसिंग साबळे, वय ४२, रा. तरोडा, ता. मोताळा हा संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. त्याच्या दुचाकीला नायलॉनची थैली होती. पथकाने पंचासमक्ष त्याची झडती घेतली. त्याच्या थैलीत हिरवट, काळसर, कळीदार बिजा असलेला ४१ हजार रुपये किंमतीचा गांजा अंमली पदार्थ तसेच खिशात एक मोबाइल आढळून आला आहे.
पोलिसांनी गांजा, मोबाइल व दुचाकी क्रमांक एम.एच. २८ ए.के.१८९१ असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोहेकॉ दीपक लेकुरवाळे, विजय पैठणे, सुनील मिसाळ आदींच्या पथकाने केली आहे.

You may have missed

error: Content is protected !!