सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणूक मध्ये आज निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निशाणी वाटप……

IMG-20251126-WA0029


सिंदखेडराजा (अनिल दराडे)मा.राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निशाणी वाटप करण्यात आल्या.

नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना त्यांनी ज्या पक्षाकडून निवडणूक अर्ज भरला आहे व ज्यांनी ए बी प्रमाणपत्र जोडलेले आहे त्यांना त्या त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले आहे.

नगराध्यक्ष पदासाठी दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज केले होते त्यापैकी दिलीप भिकाजी चौधरी यांना पाना तर सय्यद मोबीन सय्यद नईम यांना हिरा हे निवडणूक निशाणी देण्यात आली आहे. सोबतच सर्व अपक्ष नगरसेवक पदासाठी लढणाऱ्या उमेदवारांना सुद्धा निवडणूक निशाणी वाटप करण्यात आल्या आहेत.

निवडणूक निशाणी वाटप केल्या नंतर दुपारी बारा वाजता सर्व पक्षांच्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक निशाणी बाबत तसेच निवडणुकी संदर्भात त्यांना पडणाऱ्या प्रश्नाबाबत मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी मार्गदर्शन केले.

मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण निशाणी वाटप प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

आजच्या या निशाणी वाटपाला मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे, मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आशिष बोबडे ,मा. तहसीलदार अजित दिवटे, नायब तहसीलदार नितीन बढे, प्रसार माध्यम नोडल अधिकारी प्रकाश शिंदे तसेच इतर सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!